आत्महत्या करणाऱ्या तरुणीला पोलिसांनी दिले जीवदान

Police give life to girl who attempt to suicide.jpg
Police give life to girl who attempt to suicide.jpg

वारजे माळवाडी : तलावात आत्महत्या करण्यास गेलेल्या तरुण मुलीला सुट्टीवर असलेल्या फिरण्यास आलेल्या पोलिसांनी वाचवल्याची घटना तीन दिवसांपूर्वी आंबेगाव खुर्द या ठिकाणी घडली.

महाशिवआघाडी झाली तरीही पुण्यात भाजपचेच वर्चस्व

तरुण मुलीला वाचविण्याऱ्या पोलिसांचे नाव सद्दाम शेख आहे. तो पोलिस वारजे माळवाडी येथील कार्यरत आहे. त्यांची बुधवारी सुट्टी होती. ते आंबेगाव खुर्द परिसरात राहतात. बुधवारी सुट्टी असल्यामुळे ते घरी आराम करीत होते. मित्रासमवेत ते आंबेगाव खुर्द येथील तलावाकडे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी तिथून घरी परत येत होते. काही मुलं गर्दी करून उभी होती. त्यांनी सांगितले की, समोर एक महिला पाण्यात बुडत आहे.

भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू

सद्दाम यांनी तातडीने आपला मोबाईल तेथील मित्राकडे दिला आणि त्यांनी लगेच अंगावरील कपड्यासह पाण्यात उडी घेतली. तिची हालचाल थांबली होती. पाण्यावर पुर्णपणे तरंगत होती. त्यांनी संबंधित मुलीच्या कपड्याला धरून पोहत तिला पाण्याबाहेर काढले. सद्दाम यांनी त्यांचे पाय टेकल्यावर तिला उचलून तिला पाणी बाहेर काढले. त्यानंतर तिच्या नाकात तोंडात गेलेले पाणी बाहेर काढल्यावर ती शुद्धीवर आली. त्यावेळेस तिने घरगुती भांडण झाल्यामुळे ती आत्महत्या करण्यासाठी येथे आली होती. अशी माहिती दिली. 
धक्कादायक! पिंपरीत तरुणीवर बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न 

दरम्यान सद्दाम शेख यांच्या अंगावरील कपडे भिजल्यामुळे कपडे बदलण्यासाठी घरी निघून गेले. स्थानिक नागरिकांनी ती पाण्यात आत्महत्या करण्यास गेल्यावर पोलिस नियंत्रण कक्षास माहिती कळवली होती. पोलिस येणार असे सांगितल्यानंतर ती मुलगी घाबरून घरी निघून गेली. 

पुणेकरांनो चला! हिंजवडीपासून 45 मिनिटांवर आहे स्वर्ग... 

वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात नेमणुकीला असलेले सद्दाम शेख हे मूळचे लातूरचे असून गावकडेच ते पोहायला शिकले आहेत. पोहण्याचा चांगला सराव झाला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com