पोलिसांनी दिली शाळकरी मुलींना लिफ्ट

राजकुमार थोरात
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : वेळ...दुपारी साडेबाराची...ठिकाण - अंथुर्णे (ता.इंदापूर) येथील बसस्थानक...शिकवणीसाठी चाललेल्या चार मुली पोलिसांच्या गाडीला हात करुन जंक्शनपर्यंत लिफ्ट मागातात. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे गाडीमध्ये मुलींना बसवून जंक्शनमध्ये सोडल्यानंतर मुलींच्या चेहऱ्यावरती पोलिसांच्या गाडीत बसल्याचा आनंद गगनात मावेनासा होता.

ग्रामीण भागामध्ये  पोलिसांच्या गाडीची व पोलिसांची धास्ती सर्वसामान्य नागरिक आजही घेत आहेत. शालेय विद्यार्थी  पोलिसांपासुन चार हात दुरच असतात. वालचंदगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलिस नाईक गणेश काटकर, विजय शेंडकर आज शुक्रवारी (ता. २०) दुपारी अंथुर्णे गावामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी सरकारी पोलिस गाडीमधून गेले होते. यावेळी अंथुर्णे बसस्थानकावर जंक्शनकडे जाण्यासाठी साक्षी म्हस्के, साक्षी शिंदे, नेहा धापटे, वर्षा खराडे या चार मुली थांबल्या होत्या. त्यांना शिकवणीला जायाचे होते. उन्हाचा चटके खात मुली बसची प्रतिक्षा करीत होत होत्या. यावेळी पोलिसांची गाडी बसस्थानकावर येताच चारही मुलींनी भजनावळे यांना आम्हाला जंक्शनपर्यंत लिफ्ट देता का? अशी विचारणा केल्यानंतर भजनावळे यांनी मुलींना गाडीमध्ये बसण्यास सांगितले.

एरवीच्या वेळी पोलिसांनी घाबरणाऱ्या मुली पोलिसांच्या गाडीमध्ये धाडसाने बसल्यामुळे  अंथुर्णे माजी सरपंच राहुल साबळे, अंकुश भुजबळ, लहू भुजबळ, अंकुश साबळे यांनी मुलींचे कौतुक केले. भजनावळे यांनी मुलींना जंक्शनमध्ये पर्यंत सोडले. प्रवासादरम्यान मुलींनी पोलिसांशी गप्पा मारल्या. जंक्शनमध्ये उतरल्यानंतर पोलिसांच्या गाडीमध्ये बसल्याचा आनंद गगणात मावेनासा झाला हाेता.

यासंदर्भात वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी सांगितले की, शाळेतील मुला-मुलींनी धाडस करणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रसंगाला धाडसाने सामोरे जावे.मुलींना पोलिसांच्या गाडीला लिफ्ट मागण्याचे केलेले धाडस कौतुकास्पद आहे. समाजातील सर्व मुला-मुलींनी काही अडचण,तक्रार असल्यास धाडसाने तातडीने नजीकच्या पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

Web Title: police gives lifts to school going girls