गनिमी काव्याने बसवलेला संभाजी राजेंचा पुतळा पोलिसांनी हटविला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

पुणे : स्वाभिमान संघटनेच्या खेड तालुका अध्यक्ष गणेश कारले या तरूणाने जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानामध्ये बसविलेला संभाजी महाराजांचा पुतळा अखेर पोलिसांनी हटविला. याचबरोबर उद्यानाभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 
संभाजी उद्यानामध्ये संभाजी महाराज व राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसविण्यावरुन अनेक दिवसांपासुन वाद सुरु आहेत. संभाजी महाराजांच्या नावाने असलेल्या उद्यानात गडकरी यांचा पुतळा कशाला? असा प्रश्न उपस्थित करुन दोन वर्षापूर्वी उद्यानातील गडकरी यांचा पुतळा हटविण्यात आला होता. या पाश्वभूमीवर बुधवारी रात्री स्वाभिमान संघटनेच्या खेड तालुका अध्यक्ष गणेश कारले याने उद्यानानध्ये पुतळा बसविला. हा पुतळा काढल्यास महाराष्ट्र पेटल, अशा आशयाचा फलक संबंधित ठिकाणी लावला. दरम्यान कारलेने संभाजी महाराजांच्या पुतल्यासमवेत सेल्फी काढत तो व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली.

दरम्यान, या प्रकारामुळे वातावरण बिघडु नये, यासाठी पोलिसांनी हा पुतळा तत्काळ हटविला. तसेच उद्यानाभोवती पोलिस बंदोबस्तही वाढविला.

छत्रपती संभाजी उद्यानात गनिमी काव्याने बसवला संभाजी राजेंचा पुतळा

Web Title: Police have removed statue of Sambhaji Raje installed secretly