पिंपरी : मोटारीच्या धडकेत पोलिस जखमी
रवींद्र सरमहाले (रा. पंचमसृष्टी अपार्टमेंट, तापकीर नगर, आळंदी) असे जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. मारुती सुझुकी मोटार क्रमांक एमएच-१८-एसी-११४७ वरील चालक, असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पिंपरी (पुणे) : भरधाव वेगातील मोटारीने धडक दिल्याने पोलिस कर्मचारी जखमी झाला. ही घटना आळंदी जवळील देहू फाटा येथे घडली.
रवींद्र सरमहाले (रा. पंचमसृष्टी अपार्टमेंट, तापकीर नगर, आळंदी) असे जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. मारुती सुझुकी मोटार क्रमांक एमएच-१८-एसी-११४७ वरील चालक, असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता.२९) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पोलीस कर्मचारी सरमहाले हे आळंदी जवळील देहू फाटा येथे कर्तव्यावर होते. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपीच्या मोटारीस पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला.
मात्र चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून मोटार भरधाव वेगाने चालवून पोलीस कर्मचारी सरमहाले यांना धडक देऊन जखमी केले. तसेच अपघाताच्या ठिकाणी न थांबता पळून गेला. जखमी सरमहाले यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे आणि पोलीस कर्मचाऱ्यास जखमी करण्याबाबत गुन्हा दाखल झाला.