पोलिसांचा जॅमर ट्रकचालकाने पळविला 

संदीप घिसे 
रविवार, 24 जून 2018

पिंपरी : कारवाईसाठी चिंचवड वाहतूक पोलिसांनी ट्रकला लावलेला जॅमर ट्रक चालकाने चोरून नेला. ही घटना बिजलीनगर येथे घडली.
 परमेश्‍वर गोविंद केंद्रे (वय 48, रा. मु.पो.शिवली, ता.जि. जालना) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी ट्रक चालकाचे नाव आहे. चिंचवड वाहतूक विभागातील पोलिस नाईक सतीश बाबूराव मगर (वय 48) यांनी शनिवारी (ता.23) चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मगर यांनी चिंचवडच्या स्पाईन रोड, बिजलीनगर चौकात, नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला 12 जून रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास कारवाईकरिता जॅमर लावला. मात्र आरोपीने हा बाराशे रुपयांचा जॅमर चोरून नेला. सहायक निरीक्षक सपना देवतळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Police jammer escaped with truck driver