पोलिस अधिकाऱ्यांच्या शहरांतर्गत बदल्या

पोलिस अधिकाऱ्यांच्या शहरांतर्गत बदल्या

पुणे - पुणे पोलिस आयुक्तालयात कार्यरत असणाऱ्या सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी मंगळवारी काढला. 

चतु:शृंगी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्याकडे पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या मानव संसाधन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली; तर सहायक पोलिस आयुक्त धनंजय धोपावकर यांची पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांची येरवडा, दीपक लगड यांची डेक्कन; तर राजेंद्र पाटील यांची विमानतळ पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली. 

डेक्कन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांची चतु:शृंगी पोलिस ठाण्यात; तर प्रतिभा जोशी यांची उत्तमनगर पोलिस ठाणे व जगन्नाथ कळसकर यांची वारजे पोलिस ठाण्यात नेमणूक केली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी बाळासाहेब कोपनर असणार आहेत. 

आर्थिक गुन्हे शाखेतील निरीक्षक सुनील कलगुटकर हे विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक म्हणून; तर अरुण आव्हाड यांची विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात बदली झाली. याबरोबरच पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते, सयाजी गवारे, अरुण वायकर, संजय सातव, विजयकुमार शिंदे, मच्छिंद्र पंडित, सुरेश बेंद्रे यांची गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली. याबरोबरच ६४ सहायक पोलिस निरीक्षक व २२३ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.

वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या
शहरातील विश्रामबाग, डेक्कन, वारजे, उत्तमनगर, सिंहगड रस्ता, समर्थ, वानवडी, उत्तमनगर, चतु:शृंगी, खडकी, विमानतळ, चंदननगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com