Vidhan Sabha 2019 : अमित शहांच्या रॅलीसाठी पोलिसांचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

Vidhan Sabha 2019 : शिरुर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशिरुरमध्ये आज होणाऱ्या रॅलीसाठी मार्गावरील दुकानं, हॉटेल्स बंद ठेवण्याचे शिरूर पोलिसांनी आदेश दिले आहेत. शिरुर पोलिसांकडून व्यापाऱ्यांना नोटिस बजविण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज शिरूर शहरात भाजपचे उमेदवार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रचारार्थ रॅली काढणार आहेत. दुपारी साडेतीन ते पाच या वेळेत शिरूर शहरातील पाबळ फाटा ते बी जे कॉर्नर या मार्गावर ही रॅली होणार आहे. या रॅलीला कोणताही अडथळा होऊ नये यासाठी या मार्गावरील सर्व दुकाने, हॉटेल्स बंद ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. 

No photo description available.दरम्यान, व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवल्यामुळे आपले नुकसान होणार असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दुकान सुरू ठेवण्यास परवानगी दिली. परंतु, या दुकानांसमोर कुठलीही वाहने पार्क करू नये अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police order closure of shops for Amit Shah's rally At Shirur For Maharashtra Vidhan Sabha 2019

टॅग्स
टॉपिकस