esakal | प्रवास करण्याबाबतच्या पासबाबत पुणे पोलिसांचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर 
sakal

बोलून बातमी शोधा

police.jpg

लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यामध्ये विविध नियम शिथिल करण्यात आले आहेत.  मात्र पुणे जिल्हा अंतर्गत, पुण्याबाहेर किंवा पुण्यात येण्यासाठी पोलिस पास गरजेचा असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

प्रवास करण्याबाबतच्या पासबाबत पुणे पोलिसांचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यामध्ये विविध नियम शिथिल करण्यात आले आहेत.  मात्र पुणे जिल्हा अंतर्गत, पुण्याबाहेर किंवा पुण्यात येण्यासाठी पोलिस पास गरजेचा असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

- पैसे गेले अन् गाडीही सुटली; परराज्यातील कामगारांवर भामट्यांमुळे आली ही वेळ!

पुणे शहरात अद्याप नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आलेली नाही. पुणे जिल्हा आणि परिसरात बारामती, इंदापूर, वालचंदनगर याच ठिकाणी एसटी सुरू आहे. यामुळे नागरिकांना प्रवास करण्यासाठी कोणतीही सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नाही. पर्यायाने नागरिकांना खासजी वाहनांचा वापर करावा लागत आहे. अशावेळी प्रतिबंधित क्षेत्रांमधील नागरिक इतरत्र प्रवास करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत पुण्यातील प्रवासासाठी पास काढणे गरजेचे आहे.

- Big Breaking : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द; मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली घोषणा!

पास कोणत्या कारणासाठी काढण्यात येत आहे तसेच संबंधित वाहनातून किती प्रवासी प्रवास करणार आहे. याबाबत पूर्वी असलेले नियम कायम राहणार आहेत, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. 

केंद्र सरकारने पाचवा लाॅकडाऊन जाहीर करताना दिलेल्या सवलती महाराष्ट्र सरकारने देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक बाबी उघडण्यास परवानगी मिळणार नाही. तसेच एकूण संख्येच्या निम्मीच दुकाने सुरू राहतील, अशी व्यवस्था केली आहे. हाॅटेल आणि रेस्टाॅरंटही बंद राहतील. प्रार्थनास्थळेही सर्वांसाठी खुली करण्यास परवानगी मिळालेली नाही. खासगी कार्यालये दहा टक्के क्षमतेने सुरू करता येणार आहे. कार्यालय सुरू होणार असल्याने आता नोकरदारांची कामाच्या ठिकाणी किंवा शहरात येण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मात्र शहरात येण्यासाठी पास आवश्यक आहे की नाही याबाबत त्यांच्या मनात संभ्रम आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारचे नियम वेगवेगळे आहेत. त्यामुळे देखील नागरिकांचा गोंधळ होत असल्याचे पहायला मिळते.

- पुणेकरांनो सावधान : पुढचे चार दिवस धोक्याचे, हवामान खात्यानं दिलाय इशारा

 पुण्यात येण्यासाठी किंवा इकडून बाहेर जाण्यासाठी अद्याप पूर्णतः वाहतूक खुली करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवासाबाबत पूर्वीचे जे नियम आहेत तेच पुढील आदेश येईपर्यंत कायम असणार आहेत. आत्तादेखील पास मिळण्यासाठी अनेक अर्ज आलेले आहेत. छाननी करून त्यांना मंजुरी देण्यात येत आहे. -बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा