पोलिसांच्या ‘फोन अ फ्रेंड’ला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

पिंपरी - नागरिकांना पोलिसांशी मुक्‍तपणे संवाद साधता यावा, यासाठी पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी ‘फोन अ फ्रेंड’ हा उपक्रम राबविण्यास सुरवात केली. एका महिन्यात एक हजार ३९४ नागरिकांनी पोलिसांकडे आपल्या तक्रारी मांडल्या. आलेल्या तक्रारीबाबत स्थानिक पोलिसांनी काय उपाययोजना केली, याबाबत आयुक्‍त लक्ष ठेवून आहेत.

या उपक्रमात नागरिकांना जाणवणाऱ्या समस्या पोलिस आयुक्‍तांनी जाहीर केलेल्या क्रमांकावर सांगायच्या. त्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस नियंत्रण कक्षाकडून स्थानिक पोलिसांना दिल्या जातात. केलेल्या कारवाईची नोंद आणि पोलिस कर्मचाऱ्याचे नाव नोंदवहीत नोंद केले जाते. १० जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान एक हजार ३९४ नागरिकांनी ‘फोन अ फ्रेंड’च्या हेल्पलाइनवर फोन केला. तुम्ही फोन केल्यावर पोलिसांनी तुमच्याशी संपर्क केला का? तुमच्या तक्रारीचे निवारण झाले का? अशी विचारणा पोलिस आयुक्‍त तक्रारदारास करतात.

फोन अ फ्रेडसाठी संपर्क
०२०-२७३५२५००
०२०-२७३५२६००

नागरिकांना कमी वेळेत पोलिसांची मदत मिळावी, यासाठी संघाची (टीम) संकल्पना राबविली. ‘टीम फोन अ फ्रेंड’च्या हेल्पलाइनवर फोन आल्यास ते तत्काळ मदतीला पोचतात. तक्रारदारापर्यंत किती वेळेत पोलिस पोचतात, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनाही ‘फोन अ फ्रेंड’च्या तक्रारदारांना एका तासाने फोन करून फीडबॅक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- आर. के. पद्मनाभन, पोलिस आयुक्‍त

Web Title: Police Phone a Friend Response