तळेगावात ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

तळेगाव स्टेशन : रेल्वे स्टेशनच्या यशवंतनगर कडील बाजूच्या वीरचक्र चौकात चालू असलेल्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर तळेगाव दाभाडे पोलिसांनी बुधवारी (ता.22) सायंकाळी छापा टाकून, चार आरोपींसह एकूण 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.       

तळेगाव स्टेशन : रेल्वे स्टेशनच्या यशवंतनगर कडील बाजूच्या वीरचक्र चौकात चालू असलेल्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर तळेगाव दाभाडे पोलिसांनी बुधवारी (ता.22) सायंकाळी छापा टाकून, चार आरोपींसह एकूण 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.       

तळेगाव स्टेशन येथे बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरी जुगार अड्डा चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवडचे सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, कर्मचारी सुर्यकांत गोरडे, विठ्ठल वडेकर, दीपक कदम आदींच्या पथकाने वीरचक्र चौकात सापळा रचून धाड मारली. यावेळी मयूर शिवाजी बोऱ्हाडे (वय 26,शिरुर पुणे), कोमीर वसंत बुराडे (28), अजय दिलीप गायकवाड (19), विठ्ठल मानाजी सांगळे (32) (तिघेही रा.तळेगाव दाभाडे, मावळ, पुणे) हे चार आरोपी ऑनलाइन जुगार चालवत असल्याचे आढळले.

पोलिसांनी चारही आरोपींना अटक करुन 8 हजार 400 रुपये रोकड, 42 इंची स्क्रीन टीव्ही, संगणक सीपीयू, कीबोर्ड, डोंगल असा एकूण 45 हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चारही आरोपींना गुरुवारी (ता.23) वडगाव मावळ न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिनावर सुटका केली. पुढील तपास उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे करत आहेत. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचा नवीन पिंपरी चिंचवड आयुक्तालयात समावेश झाल्यानंतर तळेगावातली ही पहिलीच करवाई असून, यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. परिसरात खुलेआम चालू असलेल्या मटका आणि अवैध दारु धंद्यांवरही कारवाईची नागरिकांची मागणी आहे.

Web Title: police raid on Online gambling in Talegaon