आयटीच्या सुरक्षेसाठी पोलिस सज्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पिंपरी - तळवडे आयटी पार्कच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी योग्य नियोजन केले असून, त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे, अशी माहिती देहूरोड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली.
पोलिस आणि तळवड्यातील आयटी कंपन्यांचे अधिकारी यांच्यात गुरुवारी (ता. २९) बैठक झाली. त्यात प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली. 

आयटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पेट्रोलिंग वाढवण्यात येणार आहे. वाहनांची तपासणी, नाकाबंदी करण्यात येणार आहे. चार ते दहा पोलिसांचे पथक कार्यरत राहणार असल्याचे धस यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत तळवडे आयटी पार्कमध्ये सीसीटीव्ही लावण्याची सूचना पोलिसांनी पालिका प्रशासनाला केली आहे. त्याचा तपशीलही त्यांना देण्यात आला आहे. कॅमेरे बसविल्यानंतर परिसरावर कायम लक्ष ठेवणे शक्‍य होणार आहे. या भागात त्यांनी वैयक्तिक सीसीटीव्ही बसवले आहेत, त्यांनी ते बाहेरील बाजूला लावावेत, अशा सूचना देण्यात येणार आहेत.

सायंकाळी होणारी कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. पोलिस आयुक्‍त कार्यालयाने तळवडे आणि देहू परिसरासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू केली आहे. ’’

पोलिस आयुक्‍तांना निवेदन
आयटी कंपन्या सरकारने कॅबसाठी केलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे फोरम फॉर आयटी एम्प्लाईजचे (फाइट) अध्यक्ष पवनजित माने यांनी सांगितले. रात्री कॅबने घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षारक्षक दिले जातात का, कंपन्यांच्या वाहनांना जीपीएसची सुविधा बसवण्यात आली आहे का, कंपन्यांकडून हे नियम पाळले जातात का, याची पोलिसांनी तपासणी करण्याची आवश्‍यकता आहे. कंपन्यांकडून नियम पाळले जात नसतील तर त्यांना अंमलबजावणी करण्यास सांगावे, असेही ते म्हणाले. यासंदर्भातील निवेदन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तांना देणार असल्याचे माने यांनी सांगितले. 

Web Title: Police ready for IT Company Security