दिवाळी आधीच तुरुगांत जायचे नसेल तर...; महाराष्ट्र पोलिसांचा इशारा

police
police

विधानसभा 2019
पिंपरी -  विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी मिरवणुका काढण्यास परवानगी नसल्याची माहिती पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिली. यासह मतमोजणीच्या ठिकाणी व शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता. 24) बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार असून मावळ विधानसभेची मतमोजणी तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज येथे होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्ते विजयी उमेदवाराची मिरवणूक काढतात. यामध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे पोलिसांनी अशा विजयी मिरवणुकीस परवानगी नसल्याचे स्पष्ट केले. तरीही मिरवणूक काढल्यास अशा "उत्साही' कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 

निकालाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बालेवाडी येथे स्ट्रॉंग रूमव्यतिरिक्त परिसरातील बंदोबस्तासाठी एक उपायुक्त, दोन सहायक आयुक्त, आठ निरीक्षक, नऊ सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक, 130 कर्मचारी असतील. वाहतूक नियोजनासाठी एक सहायक आयुक्त, दोन निरीक्षक, चार सहा सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक यासह तीस कर्मचारी असतील. यासह निमलष्करी दलाची व राज्य राखीव पोलिस दलाची प्रत्येकी एक तुकडी तैनात असेल; तर तळेगाव दाभाडे येथील बंदोबस्तासाठी एक अतिरिक्त आयुक्त, एक सहायक आयुक्त, सहा निरीक्षक, चोवीस कर्मचारी; तसेच विशेष शाखेचे दहा कर्मचारी आणि वाहतूक नियोजनासाठी एक निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक, वीस कर्मचारी असतील. 

यासह निकालादरम्यान शहर परिसरातही कायदा सुव्यवस्था कायम राहावी यासाठी एक उपायुक्त, एक सहायक आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली पोलिस ठाणेनिहाय बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. यामध्ये ठाण्यांच्या हद्दीतील संवेदनशील ठिकाणे, प्रमुख चौक, उमेदवारांचे निवासस्थान, संपर्क कार्यालय आदी ठिकाणी बंदोबस्त असेल. गुन्हे शाखेचे पथकही शहरात ठिकठिकाणी गस्त घालणार आहे. 

बालेवाडी येथील बंदोबस्त 
उपायुक्त - 1 
सहायक आयुक्त - 2 
निरीक्षक - 8 
सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक - 9 
कर्मचारी - 130 
निमलष्करी दलाची एक तुकडी 
राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com