मनसेच्या दुचाकी रैलीस पोलिसांचा नकार, तरिही मनसे रैली काढणार

Police refuse MNS two-wheeler rally in Pune
Police refuse MNS two-wheeler rally in Pune

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रविवारी मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्याच्या पार्श्‍वभुमीवर शनिवारी पुण्यात मनसेकडून दुचाकी रॅली काढण्यात येणार होती. त्यास वाहतुक कोंडीचे कारण सांगून पुणे पोलिसांनी नकार दिला आहे. पोलिसांच्या या भुमिकेनंतरही मनसे मात्र रॅली काढण्यावर मनसे ठाम आहे. 

बांग्लादेशी व पाकिस्तानी नागरीकांना देशाबाहेर हाकलण्यासाठी मनसेकडून मुंबईमध्ये रविवारी मोर्चा काढत आहे. या मोर्चाची तयारी करण्याच्या उद्देशाने शनिवारी पुण्यात मनसेकडून पाच हजार दुचाकींचा सहभाग असलेली रॅली काढण्यात येणार होती. ही रॅली शनिवारी सकाळी साडे दहा वाजता सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय, लक्ष्मी रस्ता, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याने "एसएसपीएमएस' संस्थेच्या मैदानावर जाऊन तेथेच या रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीच्या परवानगीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे पाठपुरावा केला होता. याबाबत मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे म्हणाले, "" रॅलीबाबत सर्व कार्यकर्त्यांना निरोप दिले आहेत. सर्व तयारी झाल्यानंतर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परंतु आम्ही आमच्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे रॅली काढणार आहोत.'' 

पुण्यात मानसी नाईकचा विनयभंग

दरम्यान, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे म्हणाले, "" संबंधीत रॅलीमध्ये पाच हजार दुचाकी सहभागी होतील. त्यामुळे ऐन रहदारीच्यावेळी ही वाहने रस्त्यावर आल्यास मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होईल. त्यामुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागेल. या कारणामुळे आम्ही रॅलीला नकार दिला आहे. त्यानंतरही त्यांनी रॅली काढल्यास विनापरवाना रॅली काढणे व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com