पोलिसांनी वाचविले आजी, नातवाचे प्राण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

पोलिस देवासारखे धावून आल्याने माझा व नातवाचा जीव वाचल्याची भावना या चालकाच्या आजीने व्यक्त केली.

हडपसर  - टेम्पो चालविताना चालकाला अचानक भोवळ आल्याने तो बेशुद्ध पडला. त्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी धावत जाऊन टेम्पो बंद करून या चालकाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. पोलिस देवासारखे धावून आल्याने माझा व नातवाचा जीव वाचल्याची भावना या चालकाच्या आजीने व्यक्त केली.

मयूर जाधव (वय ३०, रा. लोहगाव) हा तरुण शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास आजीसमवेत टेम्पोतून जात होता. त्या वेळी त्याचा टेम्पो मुंढवा पुलाजवळ आला असता त्याला भोवळ आली, त्यामुळे त्याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले. ही बाब त्याठिकाणी असलेले पोलिस कर्मचारी प्रवीण ढोण व सचिन हनवते यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ धावत जाऊन टेम्पो बंद केला. त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या मयूरला त्याच्याच टेम्पोमधून रुग्णालयात दाखल केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police rescued grandmother grandson's life in pune