पोलिसांचा प्रतिसाद आणखी जलद

संदीप घिसे
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

पिंपरी - घटना घडल्याची माहिती मिळताच अवघ्या सात ते दहा मिनिटांमध्ये पोलिस घटनास्थळी पोचतात. या प्रतिसादाची वेळ आणखी जलद करण्यासाठी शहराच्या विविध भागांमध्ये पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. घटनेनंतर जवळचे पथक घटनास्थळी  त्वरित पोचेल. त्यामुळे पोलिसांचा प्रतिसाद जलद होण्याबरोबरच तपास आणि मदत विनाविलंब सुरू होईल.

पिंपरी-चिंचवड शहर हे पुणे पोलिस आयुक्‍तालयात असताना एखादी मोठी घटना घडली की, दंगल नियंत्रण पथक त्वरित घटनास्थळी पोचत असे. याशिवाय शिवाजीनगर येथील मुख्यालयातूनही जादा कुमक मिळत असे. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाची स्थापना झाल्यापासून हे पथक पुण्यात कार्यरत आहे. याशिवाय जादा कुमकही मिळणे बंद झाले आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत असलेल्या पोलिसांचाच जादा कुमक म्हणून वापर करावा लागत आहे. ही कुमक गेल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत होते. पोलिस आयुक्‍तांनी पोलिस ठाण्यांमध्येच पथके तयार केली आहेत. 

नागरिकांना पोलिसांचा जलद प्रतिसाद मिळावा, यासाठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी महत्त्वाची ठिकाणे निश्‍चित करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांची पथके हद्दीत ठिकठिकाणी तैनात असणार आहे. हद्दीत घटना घडताच त्या ठिकाणापासून जवळचे पथक रवाना केले जाईल.

पूर्वी चौकीतील पोलिस चौकात आणले. आता या पोलिसांना त्यांच्याच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात तैनात केले जाणार आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महत्त्वाची ठिकाणे कोणती व त्या ठिकाणी कोणते पथक तैनात आहे, याबाबत पोलिस ठाणे नियंत्रण कक्षास कळविणार आहे. यामुळे एखाद्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्या भागातील पथकाला नियंत्रण कक्ष आणि पोलिस ठाण्याकडूनही माहिती दिली जाईल. यामुळे नागरिकांना पोलिसांचा जलद प्रतिसाद मिळेल.
- आर. के. पद्‌मनाभन, पोलिस आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड

Web Title: Police response even faster