औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी 12 वर्षांनंतर पोलिसांना बक्षीस 

pune
pune

पुणे : औरंगाबाद शस्त्रसाठा तस्करी प्रकरणी राज्य सरकारने 12 वर्षांनंतर दहा लाख 80 हजार रुपयांची रोख पारितोषिके संबंधित 86 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाहीर केली आहेत. शहरातील निवृत्त सहायक आयुक्त विनोद सातव यांचा त्यात समावेश आहे. 

16 एके 47, 43 किलो आरडीएक्‍स, 50 हॅन्डग्रेनेडस, 3200 काडतुसे आदींचा त्यात समावेश आहे. वेरूळ रस्त्यावर मे 2006 मध्ये हा साठा दहशतवाद प्रतिबंधक पथकाच्या पोलिसांनी पकडला होता. त्यात दहशतवादी अबु जिंदाल, फैय्याज कागझीसह यांच्यासह 22 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यातील 14 जणांना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. राज्यात पहिल्यांदाच इतका मोठा शस्त्रसाठी पकडण्यात आला होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com