पुणे : आता पोलिसांवर आली कुत्रा शोधण्याची वेळ...

पुणे : आता पोलिसांवर आली कुत्रा शोधण्याची वेळ...

लोणावळा : आपला लाडका 'हनी' बेपत्ता झाल्याने त्याच्या प्रियजणांनी खाणंपिणं सोडलंय...गेल्या आठवड्यापासून तो बेपत्ता झालाय...त्याच्या शोधासाठी येथील पोलिसांनी देखील कंबर कसली आहे...त्यांनी आपल्या दैनंदिन जबाबदारीतून 'वेळ' काढून 'हनी'ची शोधमोहीमच हाती घेतलीय...हा बेपत्ता 'हनी' दुसरा-तिसरा कुणी नसून लोणावळ्यातील पाळीव कुत्रा आहे. 

लोणावळ्यातील खत्री पार्क वलवन येथील सखाराम पाटील यांचे जर्मन शेफर्ड जातीचे पाळीव श्‍वान "हनी' हा 18 डिसेंबरपासून बेपत्ता आहे. त्याच्यावर नितांत प्रेम असल्याने पाटील कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला. परंतु, तो कोठेही सापडला नाही. त्यामुळे आशेचे सर्व दरवाजे बंद झाल्याचे दिसू लागताच त्यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात मिसींगचा अर्ज दिला. 

जर्मन शेफर्ड हे महागडे श्‍वान मानले जाते. सखाराम पाटील यांनी "हनी'चे लहानपणापासून संगोपन केले आहे. मात्र, गेल्या आठवड्यात तो अचानक बेपत्ता झाला. मालकाशी इमान राखणारा तसेच, कधीही विश्‍वासघात न करणारा अशी ओळख असणाऱ्या श्‍वानाप्रती मालकाची असलेली ओढ पाहून पोलिसांनीही कुत्रा बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केल्याची पहिलीच घटना असावी. लोणावळा व खंडाळा हे पर्यटनस्थळ असल्याने येथे व्हीआयपींचा राबता असतो. त्यामुळे पोलिसांना नेहमी सतर्क राहावे लागते. 

वाहतूक नियमन, पर्यटनस्थळांची सुरक्षा, वेळप्रसंगी दरीत पडलेल्या पर्यटकांचा शोध, रेल्वे स्थानकावर उतरलेले, बेपत्ता झालेल्या व्यक्तींसाठी पोलिसांना शोधमोहीम राबवावी लागते. परंतु, पोलिसांनाही आता अधिक तपास करत हरवलेल्या श्‍वानाला शोधण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी माणसासारखेच पाळीव प्राणी बेपत्ता झालेल्या तक्रारीची दखल घेतल्याने "हनी'चे मालक पाटील यांनी पोलिसांचे आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com