पोलिसांनी व्यायामाकडे लक्ष द्यावे - डॅा. दिलीप माने

संदीप जगदाळे
शुक्रवार, 18 मे 2018

हडपसर (पुणे) : कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पोलिसांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे योग्य व्यायाम व आहाराकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे तणावग्रस्त व विविध व्याधी त्यांना जडतात. पोलिसांनी तणावासापासून दूर राहण्यासाठी व स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढून नियमित व्यायाम व योग्य आहार घ्यायला हवा, असे मत डॅा. दिलीप माने यांनी व्यक्त केले.  

इंडियन मेडिकल असोसिएशन व असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट, पुणे आणि हडपसर मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक रक्तदाब दिवस या निमित्ताने हडपसर पोलिस ठाण्यातील कर्मचारी व अधिका-यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी डॅा. माने बोलत होते. यावेळी मोफत रक्तदाब, रक्तातील साखर, डोळ्यांची तपासणी आणि मोफत वैद्यकीय सल्ला देण्यात आला. या शिबीरात 150 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. 

शिबीरात डॉ. चेतन म्हस्के, डॉ सचिन अबणे, डॉ राहुल झांझुर्णे, डॉ अनुराधा जाधव, डॉ शंतनू जगदाळे, डॅा. सचिन आबणे, डॉ कपिल बोरावके, डॉ नितीन लोहकरे, डॉ अभिजित दानाईत, डॉ प्रविशाल अडलिंग, डॉ सुशांत शिंदे, डॉ विजय पवार, डॉ. अमर शिंदे, डॉ. नारायण कर्णे, डॉ. साधनाधर्माधिकारी, डॉ. दिपा पाठक, डॉ. रोशनी कावळे, डॉ. नागनाथ मस्तुद, डॉ. अभय महिंदरे, डॉ वंदना आबणे, डॉ. वर्षा माळी, डॉ अनिता गवळी, डॉ प्रशांत चौधरी, डॉ मंगेश वाघ, डॉ. मंगेश बोराटे इ. डॉक्टरानी तपासणी केली.

डॅा. चेतन म्हस्के म्हणाले, "आजच्या धकाधकीच्या जीवनाच पोलिस अहोरात्र जनतेची सेवा करत असतात. त्यामुळे त्यांना शारिरीक व मानसिक व्याधी जडतात. जनतेची सुरक्षितता त्यांच्या हाती असते. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहील्यास सामाजिक आरोग्य उत्तम राहू शकेल. याच हेतून या शिबीराचे आयोजन केले. यापुढेही पोलिसांसाठी अशा प्रकारची शिबीरे नियमित घेतली जातील.

Web Title: police should concentrate on exercise said by dr dilip mane