निगडीत पोलिस उपनिरिक्षकाला धक्काबुक्की 

संदीप घिसे 
गुरुवार, 3 मे 2018

पिंपरी- भक्ती शक्ती चौक, निगडी येथे नाकाबंदी करित असताना पोलिस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली.

जयप्रकाश सन ऑफ धनंजय (वय ३२, रा.मसाई निवास, महानंदी स्ट्रीट, बल्हारी, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. पोलिस उपनिरीक्षक उमेश नानासाहेब लोंढे (वय ३९) यांनी निगडी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री उपनिरीक्षक लोंढे हे आपल्या दोन सहकारी कर्मचाऱ्यांसोबत भक्ति-शक्ती चौक, निगडी येथे नाकाबंदी करीत होते. त्यावेळी त्यांना देहूरोड कडून येणारी मोटार वेडीवाकडी येत असल्याचे दिसून आले. त्यांनी मोटार थांबवून चालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना मागितला. यामुळे संतापलेल्या चालक जयप्रकाश याने पोलिसांशी हुज्जत घालून उपनिरीक्षक लोंढे यांना धक्काबुक्की करत ढकलून देऊन खाली पाडले. या प्रकरणी निगडी पोलिसांनी जयप्रकाश याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: police sub-inspector crime