पोलिस दलातील प्रशंसनीय सेवेबद्दल कुंभार यांचा गौरव

युनूस तांबोळी
गुरुवार, 3 मे 2018

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): दहशतवाद विरोधी पथक मुंबईचे पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण रामभाऊ कुंभार यांना पोलिस दलातील प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

मुंबई नरीम ड्रायव्हू येथील पोलिस जिमखाना मध्ये नुकताच हा गौरव समारंभ पार पडला. दहशत विरोधी पथक मुंबईचे अप्पर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील बाराबलुतेदार कुंभार कुटूंबात शिक्षण घेतलेले अधिकारी पदा पर्यंत त्यांनी यशस्वी कामगीरी करत आहेत. पोलिस शिपाई पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आहे. दहशत विरोधी पथकात गेली 3 वर्षे काम करत आहेत. पोलिस उपनिरीक्षक पदावर त्यांनी पुणे, सातारा या परीसरात काम करत अनेक धाडसी कारवाया केल्या आहेत. नुकतीच मुंबई येथील दहशत विरोधी पथकात त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे पोलिस दलातून त्यांचा पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आाला आहे. त्यांच्या उत्तम कामगीरीमुळे परीसरातून त्यांचे अभीनंदन केले जात आहे.

Web Title: police sub inspector laxman kumbhar awarded