खामगावातील सख्या भावांचे यश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

राहू - राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये खामगाव (ता. दौंड) येथील दत्तात्रेय अनंता जाधव व संतोष अनंता जाधव या भावांनी आर्थिक परस्थितीवर मात करत यश मिळवून आदर्श निर्माण केला. 

खामगावनजीक गाडोमोडी फाट्याजवळ दोन्ही भावंडे आपल्या कुंटुबीयांसमवेत राहतात. घरची परस्थिती अत्यंत बेताची आहे. दोन्ही मुलांनी उच्च शिक्षण घेऊन मोठा शासकीय अधिकारी व्हावे, ही आई-वडिलांची इच्छा होती. 

दत्तात्रेय याने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. संतोष याने कला शाखेतून पदवी मिळविली. दत्तात्रेय याने यापूर्वी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. राज्य परिवहन महामंडळामध्ये त्यांची वरिष्ठ अधिकारी म्हणून निवड झाली होती. एवढ्यावर समाधान न मानता त्यांनी चिद्द, चिकाटी, सातत्य, राखत हडपसर (पुणे) येथे  राहून एकत्रित अभ्यास करून सातत्य ठेवत यश मिळविले. अभ्यासात सातत्य ठेवल्याने संतोष यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. दोघा भावांनी परस्थितीवर मात करून जिद्द, चिकाटी, अभ्यासातील सातत्य यामुळे आम्ही यश संपादन केले. इतक्‍यावर समाधान न मानता भविष्यात केंद्रीय लोकसेवा, राज्यसेवा तसेच इतर स्पर्धा परीक्षा आम्ही देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजना कुल यांच्या हस्ते या जाधव बंधूचा राहू येथे नुकताच सत्कार करण्यात आला. 

कोणतेही यश संपादन करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि कामातील सातत्यपणा ठेवल्यास काहीही अशक्‍य नाही. आमच्या आई वडिलांना आम्ही दोघेही पीएसआय बनले पाहिजे अशी इच्छा होती. त्यांचे स्वप्न आम्ही पूर्ण केले. त्याचा आनंद वाटतो.
- दत्तात्रेय जाधव 

Web Title: Police sub-inspector of the State Public Service Commission Success of the jadhav brothers in Khamgaon