वरवंडला टवाळखोरांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

वरवंड - येथे विद्यालय व महाविद्यालयाच्या आवारात टवाळखोरी करणे, विनापरवाना दुचाकी चालविणे, गर्दीत स्टंट बाजी करून इतरांना उपद्रव करणे याविरोधात गुरुवारी (ता. २३) यवत पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला. पोलिसांची अचानक कारवाई सुरू झाल्याने शाळेच्या आवारात विनाकारण घिरट्या घालणाऱ्या रोडरोमिओंची धांदल उडाली. 

टवाळखोरांच्या मुसक्‍या आवळणार असल्याचे पोलिस उपनिरीक्षक राहुल यादव यांनी सांगितले. वरवंड येथे महाविद्यालय व विद्यालयामुळे मुला-मुलींची लक्षणीय संख्या आहे. अनेक जण शाळा सुटल्यानंतर मुलींना उपद्रव करीत असतात. काहीजण मुलींच्या घोळक्‍यात गाडी घालून कर्कश हॉर्न वाजवीत जात असतात. पाटस परिसरातही टवाळखोरांची संख्या वाढली आहे. वरवंड एसटी थांब्याच्या ठिकाणी काही जण विनाकारण थांबून मोठ्याने आरडा-ओरडा करीत असतात. दुपारी महाविद्यालयाच्या गेट समोर अनेक जण थांबून वाहतुकीला अडचण निर्माण करीत असतात.

या पार्श्वभूमीवर यवत ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटस पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक राहुल यादव, रणजीत निकम, प्रवीण भोडेटे यांच्या पोलिस पथकाने गुरुवारी (ता.२३) वरवंड येथे कारवाईस सुरवात केली. 

दोन दिवसांपासून पोलिसांनी टवाळखोर व बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध कारवाइची मोहीम उघडली आहे. वरवंड येथे चौकात कारवाईदरम्यान उपनिरीक्षक राहुल यादव यांना आवर्जून भेटून साहेब जोरात कारवाई करा, अशी ग्रामस्थांनी मागणी केली व कारवाईचे स्वागत केले.

Web Title: police take action on road romeo

टॅग्स