दोन पोलिस पथकांद्वारे आरोपींचा शोध सुरू

Police
Police

पिंपरी - नाशिक फाटा उड्डाण पुलावर पतंगाचा मांजा अडकून डॉ. कृपाली निकम यांचा मृत्यूप्रकरणी पोलिसांनी दोन तपास पथकाद्वारे आरोपींचा शोध सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गाडे यांनी मंगळवारी (ता.९) सांगितले.

भोसरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहितेतील निष्काळजीपणामुळे किंवा अविचाराने किंवा हयगयीने मृत्यू घडवून आणणे या कलम ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चिनी मांजामुळे देशभरात अनेक मनुष्यांसह पक्षांचाही मृत्यू व जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने २०१५ मध्ये बंदी घातली.

राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांना या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितले. मात्र, या बंदीला धाब्यावर बसवून शहरात सर्रास मांजाची विक्री चालू आहे. प्रशासनाला या आदेशाबाबत माहितीच नाही, पोलिस प्रशासनानेही आतापर्यंत कारवाईच केलेली नाही. पतंग उडवणारी लहान मुलेच असल्याने त्यांच्यात मांजाच्या दुष्परिणामांची माहिती नसते. मात्र, त्याची विक्री व उत्पादन किंवा मुलांच्या पालकांना याची समज नसते का, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. स्मिता गोडसे म्हणाल्या, ‘‘पतंग उडविणाऱ्यांवर कायद्याने बंदी घालायला हवी म्हणजे अशा घटना घडणार नाहीत. डॉ. कृपाली यांनी मोठ्या मेहनतीने वैद्यकीय शास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करून भविष्याच्या नवीन वाटचालीची सुरवात केली होती. मात्र, पतंगाचा मांजाने तिचा 
बळी घेतला.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com