पोलिसांची भांडणं; तू एकटी भेट तुझ्या तोंडावर अॅसिडच फेकतो...

crime-logo.jpg
crime-logo.jpg

पिंपरी : ''आपल्या दोघांचे काढलेले फोटो हवे असल्यास पाच लाख रुपये दे. तु एकटी भेट तुझ्या तोंडावर अॅसिड फेकल्याशिवाय शांत बसणार नाही, तुझ्या नवऱ्यालाही मारुन टाकेल''अशी धमकी एका पोलिसाने महिला पोलिस कर्मचाऱ्यास दिली. ही घटना पिंपरी येथे घडली.
 
आनंदा शाहू चौहान (वय 35, रा. साईनाथनगर, कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय महिला पोलिसाने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बुधवारी (ता. 16) सकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी महिला पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी ड्युटीवर जात होत्या. दरम्यान, पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियमजवळ आरोपींने त्यांना अडविले. त्यांचा भर रस्त्यात विनयभंग केला.

"तु माझी झाली नाही तर, तुला कोणाचीच होऊ देणार नाही, तु फक्त एकटी भेट तुझ्या तोंडावर अॅसिड फेकल्याशिवाय शांत बसणार नाही. तुझ्या नवऱ्यालाही मारुन टाकीन. 
आपल्या दोघांचे फोटो माझ्याकडे आहेत. ते सर्वांना दाखवून तुझी बदनामी करेल. तुझे जगणं अवघड करेल, तुला फोटो हवे असतील तर, मला पाच लाख रुपये दे'' अशीही धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या पतीलाही शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com