पुणे-सोलापूर मार्गावर पोलिसांच्या गाडीला अपघात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 January 2020

महामार्ग पोलिस केंद्राचे सहायक फौजदार बी. जे. जाधव यांनी सांगितले, सोलापूर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 मधील पोलीस अधिकारी व कर्मचारी दौंड येथे फायरिंग साठी जात असताना, बिजवडी गावच्या हद्दीत प्रवास करत असलेल्या मिनी बसचा (क्र. MH13 P  0437) डाव्या बाजूचा पाठीमागील टायर फुटल्याने बस पलटी झाली.

कळस : पुणे-सोलापूर महामार्गावर बिजवडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत पोलिस कर्मचाऱ्यांच्या मिनी बसचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजता घडली. बसमधील पोलिस  कर्मचारी सोलापूर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा मधील आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महामार्ग पोलिस केंद्राचे सहायक फौजदार बी. जे. जाधव यांनी सांगितले, सोलापूर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 मधील पोलीस अधिकारी व कर्मचारी दौंड येथे फायरिंग साठी जात असताना, बिजवडी गावच्या हद्दीत प्रवास करत असलेल्या मिनी बसचा (क्र. MH13 P  0437) डाव्या बाजूचा पाठीमागील टायर फुटल्याने बस पलटी झाली. यामध्ये बसमधील चालक पोलिस नाईक यू. आर. सातव व पोलिस शिपाई एस. डी. चव्हाण हे जखमी झाले. तर सहाय्यक फौजदार एस. बी. बगाड, पोलिस कर्मचारी एस. आर. काळे, एस.ए. पवार, एस. व्ही. तीर्थकर, व्ही. एस. साबरे, जी. एच. जाधव, एस. एम. बनसोडे यांना किरकोळ मार लागला.

जखमींमधील चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली आहे. या पोलिस कर्मचार्यांना इंदापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महामार्ग पोलिस केंद्राचे सहाय्यक फौजदार बी. जे. जाधव, पोलीस हवलदार डी. के. मदने, भिमराव आहेर, एन. डी. वाघ यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्तांना मदत केली. क्रेनच्या साह्याने बस बाजूला करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police van accident on pune solapur highway