सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पुणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियावर जोरदार धुमश्‍चक्री होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यावर पोलिसांची नजर राहणार आहे. राजकीय नेत्यांचे फोटो मॉर्फिंग, त्यांच्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर व विनोद प्रसारित करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले आहे. 

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम, तेलंगणा या पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागला. त्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर बदनामीकारक मजकिूर, फोटो मॉर्फिंग, विनोद प्रसारीत करून एकमेकांवर चिखलफेक करण्यास सुरवात झाली आहे. मंगळवारी दिवसभर व्हॉटस्‌अप, फेसबुक, ट्‌विटर यांसारख्या सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू होता. याच पद्धतीने महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्येही राजकीय नेत्यांची बदनामी करणे, जातिवाचक किंवा धार्मिक भावना दुखविणाऱ्या वादग्रस्त पोस्ट, छायाचित्रे पाठवून समाजात भांडणे निर्माण करण्याचा प्रकार घडण्याची शक्‍यता साबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वर्तविली आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवत जनजागृतीवर भर दिला आहे. 

सायबर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे म्हणाले, ""लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरुद्ध बदनामीकारक मजकिूर, फोटो मॉर्फिंग किंवा अफवा पसरविले जाण्याची शक्‍यता आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये हे चित्र दिसले. त्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी त्यांना आलेले चुकीचे मेसेज, फोटे इतरांना न पाठविता, त्याचा युआरएल काढून ठेवावा. त्यामुळे आरोपींचा तत्काळ शोध घेता येईल. तसेच त्याविषयी तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.'' 

. . . . . . 

Web Title: Police Watch on Social Media!