कैद्याने कारागृहातच फरशीने केला पोलिसावर हल्ला; पोलिस जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

  • कैद्याच्या हल्ल्यात पोलिस जखमी 

पुणे : कारागृहामध्ये पहारा देणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर कैद्याने फरशीच्या तुकड्याने हल्ला केला. त्यामध्ये पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आकाश उर्फ मुन्ना दत्तात्रय म्हस्के असे हल्ला करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. तर साहेबराव हरीदास राऊत असे या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी तुरुंग अधिकारी दत्तात्रय सोनूने यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हस्के हा सराईत गुन्हेगार असून तो न्यायाधीन बंदीवान आहे.

पाकिस्तानीच म्हणतात, 'सरकार लाज वाटू द्या, भारताकडून काहीतरी शिका'

राऊत हे नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी दहा वाजता कारागृहातील एका बराकीमध्ये पहारा देत होते. त्यावेळी आकाशलाही त्याच बराकीत सोडण्यात आले. त्यावेळी त्याने तेथील फरशीचा एक तुकडा लपवून आतमध्ये आणला. त्यानंतर त्याने फरशीच्या तुकड्याने फिर्यादी राऊत यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये राऊत हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल वाघमारे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Policeman injured in prisoner attack in Pune