पुण्यात बालकांना देण्यात येणार पोलिओची लस; लसीकरणास उपस्थित न राहणाऱ्या बालकांना...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

- पुण्यासह जिल्ह्यात लसीकरण मोहीम 19 जानेवारीला

पुणे : आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात 19 जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत पुणे शहरासह जिल्ह्यातील पाच वर्षे वयापर्यंतच्या पाच लाख 68 हजार 830 बालकांना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी (ता. 7) पोलिओ लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए.बी. नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात तीन हजार 951 बूथच्या माध्यमातून पाच लाख 68 हजार 830 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात येईल. त्यासाठी आवश्‍यक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

'फ्री काश्मीर'वरून फडणवीसांना संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

तसेच जी बालके लसीकरणासाठी बुथवर उपस्थित राहणार नाहीत, अशा बालकांना एक दिवसाच्या विश्रांतीनंतर ग्रामीण भागात पुढील तीन दिवस तर, शहरी भागात पुढील पाच दिवस पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे.' सर्वजण मिळून पोलिओ लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी करूया, असे आवाहनही त्यांनी केले.

एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये : जिल्हाधिकारी

जिल्ह्यात एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. शहर आणि जिल्ह्यातील सर्व बसस्थानक, रेल्वे स्थानक, बाजार, यात्रा, धार्मिक स्थळे, खासगी दवाखाने या ठिकाणी बूथ आणि मोबाईल टिमद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Polio Vaccination program will start from 19 January in Pune