पुण्यात दोन लाखांवर बालकांना पोलिओची लस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मार्च 2019

पुणे - शासनातर्फे राबविण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेत रविवारी पुणे शहरात 2 लाख 36 हजार 731 बालकांना लस देण्यात आली.

पुणे महापालिकेतर्फे आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकार यांच्या हस्ते कै. कलावती मावळे रुग्णालयात लसीकरण मोहिमेचे उद्‌घाटन करण्यात आले. सहायक आरोग्यप्रमुख डॉ. वैशाली जाधव, डॉ. अंजली साबणे, लसीकरण अधिकारी डॉ. अमित शहा या वेळी उपस्थित होते.

महापालिकेतर्फे रेल्वे स्टेशन, बसस्थानक, शाळा, मोठ्या सोसायट्या, यांसह एक हजार 319 केंद्रांवर पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना लस देण्यात आली. येरवडा कारागृहात 16 बालकांना लस देण्यात आली. या मोहिमेत 3 हजार 957 कर्मचारी सहभागी झाले होते. आज ज्यांना लस देता आलेली नाही; त्यांच्यासाठी पुढील पाच दिवस कर्मचारी घरोघरी जाऊन लस देणार आहेत. नागरिकांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Polio Vaccine Child