राजकारणातील सेलिब्रिटीही आले मतदानासाठी..

पारोळा (जळगाव) - आधी मतदान नंतर ती चढली बोहल्यावर..
पारोळा (जळगाव) - आधी मतदान नंतर ती चढली बोहल्यावर..

पुणे - परभणी, हिंगोली आणि जळगाव जिल्ह्यातील सुमारे 25 केंद्रांवर आज तनिष्का व्यासपीठाच्या निवडणुकीसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तर मिळालाच; पण खासदार, जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांसह नव्याने नगराध्यक्ष झालेल्या लोकप्रतिनिधी, नगरसेविका मतदानासाठी आवर्जून उपस्थित होत्या.

तनिष्का व्यासपीठाच्या निवडणुकीला ऑक्‍टोबरपासून राज्यात सर्वदूर अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मेळघाटापासून वारंगा फाटा (हिंगोली) आणि वेंगुर्ल्यापर्यंत सर्वच केंद्रांवर तनिष्कांना भरभरून मतदान झाले.

मतदानासाठी महिला मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडल्या. शिवाय मिस्ड कॉलद्वारेही लाखोंच्या संख्येने मते मिळाली. आजही शेतमजूर , गृहिणी, डॉक्‍टर, वकील, शिक्षिका, बचत गटाच्या सदस्या, परिचारिका आदींनी मतदान केलेच शिवाय नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी तनिष्कांसाठी वेळ काढला. रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगरमधील केंद्रावर मतदान करून तनिष्का उमेदवारांचा उत्साह वाढवला.

जळगाव जिल्ह्यात विविध 14 केंद्रांवर आज सकाळपासून वातावरण तनिष्कामय झाले होते. ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. महापौर नितीन लढ्ढा जळगावातील मतदान केंद्रांवर आवर्जून आले. त्यांच्या पत्नी अलका लढ्ढा यांनी मतदान केले. जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनीही मतदान केले. अमळनेर तालुक्‍यातील सबगव्हाण, शिरूड येथील केंद्रांवर वृद्ध मतदारांनी उत्स्फूर्त भाग घेतला. कडाक्‍याच्या थंडीत सकाळी आठ वाजताच रांगा लागल्या होत्या. असेच चित्र परभणी, हिंगोली जिल्ह्यात होते. घरातील कामे लवकर आटोपून हजारो महिलांनी या उपक्रमात आपले सक्रिय योगदान दिले.
परभणीतील आठ तालुक्‍यात मतदान झाले. ताडकळस (ता. पूर्णा), सोनपेठ, गंगाखेड, सेलू, कोल्हावाडी (ता. मानवत), लोणी बु. (ता. पाथरी), चारठाणा (ता. जिंतूर) व बनवस (ता. पालम) येथे ही मतदान झाले. बहुतेक ठिकाणी दुरंगी लढती झाल्या. दुपारी बारानंतर महिलांची गर्दी वाढली होती. हिंगोलीत वारंगा फाटा आणि बेलमंडल येथे उत्साहात मतदान झाले.

उत्साहात मतदान
पारोळा येथील केंद्रावर मतदान करून नववधू चढली बोहल्यावर
थंडीतही महिला मतदारांच्या मोठ्या रांगा
राजकारणातील सेलिब्रिटींचा मतदानात सहभाग
पुसद (यवतमाळ)ला तनिष्का अनिता नाईक झाल्या नगराध्यक्षा
रायगड जिल्ह्यात आज मतदान, कोल्हापुरात उद्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com