राजकीय चर्चा, अंदाज आणि शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिकेच्या तब्बल ४१ प्रभागांसाठी झालेल्या मतदानानंतर जवळपास सर्वच पक्ष कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला. गेल्या १५ दिवसांपासून अहोरात्र प्रचार, पदयात्रा, कोपरा सभा, रोड शो आणि प्रत्यक्ष मतदानानंतर कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक झाली. अंतिम निकालाची प्रतीक्षा आणि उत्सुकता कायम असली, तरी सर्वच राजकीय पक्ष कार्यालयांमध्ये बुधवारी शुकशुकाट दिसून आला.

भाजप कार्यालय - निकाल पाहण्याची व्यवस्था 

पुणे - महापालिकेच्या तब्बल ४१ प्रभागांसाठी झालेल्या मतदानानंतर जवळपास सर्वच पक्ष कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला. गेल्या १५ दिवसांपासून अहोरात्र प्रचार, पदयात्रा, कोपरा सभा, रोड शो आणि प्रत्यक्ष मतदानानंतर कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक झाली. अंतिम निकालाची प्रतीक्षा आणि उत्सुकता कायम असली, तरी सर्वच राजकीय पक्ष कार्यालयांमध्ये बुधवारी शुकशुकाट दिसून आला.

भाजप कार्यालय - निकाल पाहण्याची व्यवस्था 

जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सन्मान येथील भारतीय जनता पक्षाचे मुख्य कार्यालय बुधवारी तांबडी जोगेश्‍वरी येथील भाजप मुख्य कार्यालयात हलविण्यात आले. गेल्या महिनाभरात नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांची गर्दी असलेल्या कार्यालयात हॉटेलच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणी नव्हते. तांबडी जोगेश्‍वरी येथील कार्यालयाच्या आवारातदेखील काही निवडक कार्यकर्ते वगळता एकूणच शुकशुकाट होता. गुरुवारी सकाळी १० पासून निकाल पाहण्यासाठी कार्यकर्त्यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती भाजपचे मीडिया सेलचे प्रमुख संजय मयेकर यांनी दिली.

मनसे कार्यालय - कार्यकर्त्यांअभावी शुकशुकाट

महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचार सभेमुळे मनसेच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आले होते. मंगळवारी झालेल्या प्रत्यक्ष मतदानानंतर गेल्या महिनाभरात कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची झालेली दमछाक आज झेड ब्रीजजवळील मुख्य कार्यालय आवारात दिसून आली.

एरवी नेते आणि कार्यकर्त्यांची लगबग आणि वर्दळ असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुख्य कार्यालयाला टाळे लागल्याचे 
चित्र होते.   

राष्ट्रवादी कार्यालय - निकालासाठी ‘एलईडी’ची व्यवस्था

हॉटेल ग्रीन पार्कच्या आवारातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातही शुकशुकाट दिसून आला. गेल्या महिनाभरात प्रचार, कोपरा सभा, पदयात्रा आणि नेत्यांच्या सभांनंतर दमछाक झाल्यामुळे आज पक्ष कार्यालयाकडे कोणी फिरकलेच नसल्याचे चित्र होते. याबाबत पक्ष कार्यालयाचे समन्वयक अशोक राठी म्हणाले, ‘‘एकूण १३२ प्रभागांवर नेमलेल्या समन्वयकांचा संपर्क या मध्यवर्ती पक्ष कार्यालयाच्या वॉररूमशी आहे. पक्षाच्या आवारात निकाल पाहण्यासाठी मोठा एलईडी लावणार आहे.’’ सोशल मीडियाप्रमुख मनाली पवार म्हणाली, ‘‘तीन महिन्यांपासून १२ जणांची टीम फेसबुक आणि व्हॉट्‌सॲपच्या माध्यमातून सर्व प्रभागांमधील उमेदवारांच्या प्रचाराची यंत्रणा राबवत आहे. एकूण ४१ फेसबुक आणि व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून दर तासाच्या निकालांचे अपडेट्‌स दिले जाणार आहेत.’’

काँग्रेस कार्यालय - निकालाबाबत चर्चा

काँग्रेस भवनामध्ये काही निवडक कार्यकर्ते वगळता शांतता दिसून आली. ‘‘प्रभागनिहाय निकालांची माहिती गुरुवारी (ता. २३) सोशल मीडियाच्या ग्रुपवर पाठविण्यासाठी वॉररूममधून काम चालणार आहे,’’ अशी माहिती शहर व जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस रमेश अय्यर यांनी दिली. १५ दिवसांपासून वॉररूममधून १० ते १२ जणांची टीम सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचे काम करत होते. फेसबुक आणि व्हॉट्‌सॲपच्या ग्रुपवर पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचे काम केले जात होते. गुरुवारी निकाल पाहण्याची व्यवस्था काँग्रेस भवनात केली असल्याचेही शंतनू माळशिखरे यांनी सांगितले. कार्यालयात निकालाबाबत चर्चाही रंगली होती.

Web Title: political discussion & prediction