...अन् झेडपीत अजितदादा गटाच्या स्थापनेचा अर्ध्यावरती मोडला डाव!

गजेंद्र बडे
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

पुणे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा समर्थक जिल्हा परिषद सदस्य गोंधळून गेले.

पुणे : राज्यातील सत्ता स्थापनेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि या घटनेने पुणे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा समर्थक जिल्हा परिषद सदस्य गोंधळून गेले. यामुळे अजितदादांसोबत जावे की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

तू-तू, मैं-मै करत, अखेर पुणे जिल्हा परिषदेत स्वतंत्र असा अजितदादा गट स्थापन करण्याचा निर्णयही या सदस्यांनी घेतला. पण या निर्णयाला मूर्त स्वरूप येण्याआधीच अजित पवार यांची पक्षात घरवापसी झाली. यामुळे जिल्हा परिषदेत दादा गटाच्या स्थापना अर्ध्यातच फसली.

79 वर्षांच्या वस्तादाचे डाव पैलवानांना कळलेच नाही

या गटाच्या स्थापनेसाठी  भाजप जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत एका विषय समितीच्या सभापतीच्या दालनात खेळीमेळीत चर्चाही झाली होती. हा प्रकार बैठकीच्या दिवशीच सायंकाळी  जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या कानावर गेला आणि या सदस्यांमध्ये चर्चेला उपस्थित असलेल्या एका सदस्याची देवकाते यांनी समजूत घातली आणि असा स्वतंत्र गट करण्यास मज्जाव केला. पण असं काही घडलंच नाही. ती चर्चा म्हणजे केवळ थट्टामस्करी होती, असे स्पष्टीकरण संबंधित जिल्हा परिषद सदस्याने अध्यक्ष देवकाते यांना दिले.

दरम्यान, या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी दुपारी अजित पवार यांची घरवापसी झाली. त्यामुळे पुणे झेडपीत स्वतंत्र अजित पवार गट स्थापण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political News about Pune Zilla parishad