पुणे महापालिकेच्या उद्यानात राजकीय प्रमोशन

राजकीय कार्यकर्त्यांनी दिवाळी पहाट असो की इतर संगीत मैफिल अशा कार्यक्रमांनी उद्यानाचे राजकीय प्रसिद्धी (प्रमोशन) ठिकाण करून ठेवले आहे.
Kamla Nehru Park
Kamla Nehru ParkSakal
Summary

राजकीय कार्यकर्त्यांनी दिवाळी पहाट असो की इतर संगीत मैफिल अशा कार्यक्रमांनी उद्यानाचे राजकीय प्रसिद्धी (प्रमोशन) ठिकाण करून ठेवले आहे.

शिवाजीनगर - महापालिकेची (Pune Municipal) दोनशे पाच उद्याने (Gardens) जोपासण्यासाठी साधारण वार्षिक पस्तीस ते चाळीस कोटी रुपये खर्च केले जातात. या उद्यानात व्यायाम, प्राणायाम, धावणे, चालणे, इतर व्यायाम प्रकार, हास्य क्लब, कविता सादरीकरण यासाठी नागरिक येतात. मात्र, राजकीय कार्यकर्त्यांनी (Political Activists) दिवाळी पहाट असो की इतर संगीत मैफिल अशा कार्यक्रमांनी उद्यानाचे राजकीय प्रसिद्धी (प्रमोशन) (Promotion) ठिकाण करून ठेवले आहे. कार्यक्रम फुकट असल्याने नागरिकांची देखील भरगच्च गर्दी होते.कार्यक्रम चालू असताना शेकडो वेळा आयोजकाचे नाव घेतले जाते.त्यामधून राजकीय कार्यकर्ता प्रसिध्दी मिळवत राहतो. उद्यानाच्या प्रवेशद्वारावर, आतमध्ये परवानगी नसताना मोठे फ्लेक्स लावले जातात. अशा कार्यक्रमातून शांतता भंग केली जाते.कविता वाचन, व्याख्याने, गायन यासाठी नोंदणीकृत संस्थेला कार्यक्रमासाठी अटी व शर्ती लागू करून परवानगी देण्यात यावी असा ठराव २००८ साली स्थायी समितीचे केला आहे. मात्र, राजकीय कार्यकर्ते संगीत मैफिल असे कार्यक्रम घेऊन त्यामध्ये स्वताच्या कामाचे चित्रीकरण केलेले व्हिडिओ नागरिकांना दाखवतात. अशा कार्यक्रमाच्या फ्लेक्स मधून उद्यानाचे विद्रुपीकरण होत असताना जैवविविधता धोक्यात येत आहे.

दिवाळी पहाट असो की इतर संगीत मैफिल कोणतेही कार्यक्रम महापालिकेच्या उद्यानात नको. कार्यक्रमांचा आवाज करुन लोकांना जमा करायचं मग लोकांना आपलं व्यक्तिमत्त्व किती महान आहे हे सांगायचं. हे जबरदस्तीचे प्रयोग बंद झाले पाहिजे. उद्यानात होणारे कार्यक्रम फुकट असल्याने गर्दी करायची प्रवृत्ती आपल्याकडे निर्माण झाली आहे. एखाद्या राजकीय व्यक्तीने कार्यक्रम घेतला की इतरही व्यक्ती कार्यक्रम घेतात. नागरिकांसाठी स्वतःच्या मालकीच्या म्हणून काही शांत जागा राहिला पाहिजे. ज्यामध्ये व्यायाम, शिरशासन, प्राणायम, चर्चा, ग्रुप करून बसणे, बोलणे, चालणे होईल. आम्हाला शांतपणे पक्षांचे, झाडांचे आवाज ऐकायला मिळावे. गोंगाटाशी संबंधित कार्याक्रमाचा विचार व्होयला हवा. जैवविविधता आपण जपली पाहिजे.

- अॕड. असीम सरोदे, सविधान विश्लेषक, कायदेतज्ञ, रहिवाशी एरंडवणे

कार्यक्रमासाठी दहा हजार भाडे, दहा हजार अनामत रक्कम,एक हजार सफाई शुल्क आकारले जाते. २००८ चा स्थायी समितीचा ठराव असल्याने कार्यक्रमांना परवानगी दिली जाते. सार्वजनिक कार्यक्रम बंद करायचे असतील तर स्थायी समितीचा ठराव लागेल. अटी शर्ती घालून कार्यक्रमाला परवानगी दिली जाते. नियमांचे उल्लंघन झाले तर अनामत रक्कम जप्त केली जाते.

- अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधिक्षक

क्षेत्रीय कार्यालयानुसार असलेले उद्याने

  • ढोले पाटील रस्ता - १२,

  • येरवडा - कळस - धानोरी - २०

  • नगर रस्ता- वडगाव शेरी- १२

  • औंध - बाणेर - १३

  • शिवाजीनगर - घोले रस्ता - १७

  • कोथरूड - बावधन- १३

  • धनकवडी - सहकारनगर- १९

  • सिंहगड रस्ता -११

  • वारजे - कर्वेनगर -१४

  • हडपसर- मुंढवा - १२

  • वानवडी - रामटेकडी- १०

  • कोंढवा - येवलेवाडी-१०

  • भवानी पेठ-६

  • कसबा- विश्रामबाग वाडा-२०

  • बिबवेवाडी-१६

महापालिकेची एकूण उद्याने २०५,

१७,९७,७०३ चौरस मीटर

वार्षिक खर्च

शहरातील सर्व उद्यानाचा देखभाल दुरुस्ती, नोकरदार वर्ग यांचा खर्च जवळपास पस्तीस ते चाळीस कोटी.

वार्षिक उत्पन्न

फुलराणी (लहान मुलांसाठी असलेली आगगाडी) फिरणे, प्रवेश शुल्क उत्पन्न दहा ते अकरा कोटी.

महापालिकेच्या अटी व शर्ती

  • राजकीय कार्यक्रमास परवानगी नसेल

  • ध्वनी आवाज कार्यक्रमाच्या स्थळा पुरताच मर्यादित असावा

  • उद्यानात राजकीय झेंडे, फ्लेक्स, पोस्टर लावण्यास परवानगी नसेल

  • कार्यक्रमाच्या दरम्यान सुरक्षेची जबाबदारी आयोजकांची असेल

  • कार्यक्रम सर्व नागरिकांना विनामूल्य असेल

  • कार्यक्रमासाठी पोलीस परवानगी बंधनकारक

  • स्थानिकांचा विरोध असल्यास परवानगी देण्यात येणार नाही

  • एका उद्यानात महिन्यातून एकच कार्यक्रम होईल

  • निसर्ग पर्यावरण विषयक कार्यक्रमास मोफत परवानगी असेल

  • यासह इतर नियमांच्या अधीन राहून परवानगी देण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com