Big Breaking : पुण्यातील राजकीय महिला पदाधिकाऱ्याचा पती कोरोना पाॅझिटीव्ह

corona-k.jpg
corona-k.jpg

पुणे : पुण्यात हाहाकार माजविलेल्या कोरोनाला रोखण्याची रणनीती आखण्यासाठी महापालिकेत महापौरसह पदाधिकारी, अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक पार पडली. ही बैठक आटोपली आणि बैठकीला उपस्थितीत असलेल्या पदाधिकारी महिलेच्या नवऱ्याला कोरोना झाल्याचे उघड झाले. तेव्हा या बैठकीला हजेरी लावलेल्या 30-35 पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या काळजात धस्स झाले. गंभीर बाब म्हणजे, संबंधित महिला पदाधिकाऱ्याचा कार्यक्रमांत रोजच वावर राहिल्याने महापालिकेचे वर्तुळ भेदरले आहे. दरम्यान, सर्व प्रमुख पदाधिकारी-अधिकाऱ्यांना "क्वॉरंटाइन' व्हावे लागणार का, याची भीती आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव, त्यावरच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन निर्णय लागू करण्याच्या हेतून महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सभागृहनेते धीरज घाटे, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह काही खातेप्रमुखांची बैठक सोमवारी दुपारी महापालिकेत झाली. दोन तासांच्या बैठकीत विविध मुद्दयांवर जोरदार चर्चा झाल्याने महापालिकेत या बैठकीची चर्चा होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर रात्री पदाधिकारी महिलेच्या नवऱ्याच्या तपासणीचा अहवाल आणि त्यांना कोरोना झाल्याचे उघड झाले. ही माहिती पसरताच सारे आवाक झाले. त्यातही काही पदाधिकाऱ्यांनी संतापही व्यक्त केला. काय स्थिती आहे ? कशी काळजी घ्यायची ? याचे भान नसावे ? अशा शब्दांत पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर काही मिनिटांतच आरोग्य यंत्रणा हलली आणि महिलेच्या कुटुंबातील सदस्यांसह त्यांच्या संपर्कातील नागरिकांच्या तपासणीचा निर्णय घेतला. त्यावर सोमवारपासून आपले अधिकारी नेमून तपासणीचा धडाका लावला. तेव्हा, बैठकीला हजर राहिलेल्या पदाधिकाऱ्यांना फोनाफोनी करीत, आरोग्य अधिकाऱ्यांनी साऱ्यांना धीरही दिला. तरीही महापालिकेतील पदाधिकारी प्रचंड धास्तावले असल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे. 

महापौर मोहोळ यांच्यासह महापालिकेत सर्व पदाधिकारी लोकांच्या मदतीला धावून जात आहेत. त्यानिमित्ताने आपापल्या प्रभागांत छोटेखानी कार्यक्रमही घेण्यात येत आहे. त्याकरिता पदाधिकारी-नगरसेवक लोकांची गर्दी जमवत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा प्रकारातून नगर रस्त्यावरील एक नगरसेविका आणि तिच्या पतीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळेही महापालिका आणि राजकारण्यांमध्ये भिती निर्माण झाली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com