झेंड्याची काठी माझ्याकडेच - बापट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

पुणे - 'राजकीय जीवनात वावरताना अनेकांच्या हातात झेंडा दिला. पण, काठी माझ्याकडेच ठेवली. निवडणुकीच्या काळात ही काठी वापरणार आहे.

ती नुसती उगारली तरी अनेक जण पळून जातात,'' असे सांगत, कसबा मतदारसंघात आपलाच वरचष्मा असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्र्यांदेखतच अधोरेखित केले. कसब्यात गेल्या 25 वर्षांत एकही कार्यकर्ता अन्य पक्षांत ठेवलेला नाही. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेशासाठी आता कोणीही शिल्लक राहिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या प्रभाग 16 मधील नागेश्‍वर मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी बापट बोलत होते.

राजकारणात येताना बापट यांनी हातात झेंडा दिला. त्याची काठी धरून वाटचाल करीत असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक गणेश बिडकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. बिडकर यांच्या मुद्याचा धागा पकडून बापट म्हणाले, 'अनेकांना झेंडा दिला; पण काठी माझ्याकडेच ठेवली आहे. त्या काठीने तुला (गणेश) मारणार नाही. कोणाला मारायची ते मी ठरवीन. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पुणेकर भाजपला साथ देणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची ताकद वाढेल. त्यामुळे शहराचा विकास करता येईल.''

'मी बारामतीला प्रचाराला गेल्याने अजित पवारांचा संताप झाला. तिथे मुख्यमंत्र्यांनाच नेल्याने त्यांचा तिळपापड झाला. पैसा आणि सत्तेच्या बळावर विरोधकांनी मस्ती केली. त्यात लोकांचे नुकसान झाले.''
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कसब्यातील नगरसेवक रवींद्र धंगेकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर बापट यांचे विधान सूचक मानले जात आहे.

Web Title: politics with ajit pawar & girish bapat