१९७८ आणि २०२२ च्या बंडांत अनेक ठिकाणी साम्य

पुलोदची प्रयोगाच्या आठवणी जाग्या झाल्या
politics eknath shinde shiv sena rebel 2022 Similarity of 1978 Sharad Pawar leave congress with 38 mla
politics eknath shinde shiv sena rebel 2022 Similarity of 1978 Sharad Pawar leave congress with 38 mla sakal

केडगाव : शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी पुलोद प्रयोगाच्या आठवणी जाग्या केल्या. शिंदे अनपेक्षितरित्या मुख्यमंत्री झाल्याने पुलोदची पुनरावृत्ती झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार १९७८ साली ३८ आमदारांना बरोबर घेत काँग्रेस सरकारमधून बाहेर पडले. समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करून पुलोद सरकारचा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला. जनता पार्टीकडे ९९ आमदार असताना त्यांनी ३८ आमदारांच्या गटनेता असलेल्या शरद पवार यांना मुख्यमंत्रीपद बहाल केले होते. आता भाजपकडे १०५ आमदार असताना त्यांनी ४० आमदारांच्या गटनेत्याला मुख्यमंत्रीपदी विराजमान केले आहे.

शरद पवार व एकनाथ शिंदे या दोघांच्या बंडात अनेक ठिकाणी साम्य दिसत आहे. पुलोदची पुनरावृत्ती या नजरेतून जुने कार्यकर्ते या घडामोडींकडे पहात आहेत. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेस व रेड्डी काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. निवडणुकीत रेड्डी काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या तर इंदिरा काँग्रेसला ६२ जागा मिळाल्या होत्या. २०१९ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने स्वतंत्र निवडणुका लढवल्या. १९७८ निवडणुकीत जनता पक्षाला सर्वाधिक ९९ जागा मिळवूनही तर २०१९ ला भाजपला सर्वात जास्त १०५ जागा मिळूनही सत्ता स्थापन करता आली नव्हती. कोणालाच बहुमत नसल्यानं १९७८ व २०१९ मध्ये राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. १९७८ व २०१९ या दोन्ही वेळेस विविध विचारसरणीचे पक्ष सत्तेसाठी एकत्र आले. दोन्ही वेळेस सरकारं स्थापन झाली पण घटक पक्षातील बोलघेवड्या नेत्यांमुळे स्वपक्षीय मंत्र्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला.

याची परिणीती बंडात झाली. दोन्ही वेळेस बंड झाले तेव्हा जुलै महिना होता. आणि फुटणा-या आमदारांची संख्या दोन्ही वेळेस जवळपास चाळीस घरात राहिली. १९७८ व २०१९ या दोन्ही वेळेस शरद पवार यांनी विविध विचारधारेच्या नेत्यांना, पक्षांना एकत्र आणून सरकार स्थापन केले होते. दोन्ही वेळेस केंद्र सरकारचा राज्यातील सरकारवर दबाव होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मुख्यमंत्री शरद पवार जुमानत नाहीत असं लक्षात आल्यावर पुलोद सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट आणली. दोन्ही बंडाच्यावेळी बंड करणारा नेता मुख्यमंत्री झाला आहे. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, १९७८ मध्ये झालेल्या बंडानंतर समाजवादी पक्ष लयास गेला. आताच्या बंडाची झळ कोणत्या पक्षाला बसणार हे काळच ठरवेल. पाठित खंजीर खुपसल्याचे वक्तव्य दोन्ही वेळेस चर्चेत राहिले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयात धक्कातंत्राचा वापर केला असून विरोधाकांची कोंडी केली आहे. पुढे काय होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com