आता "स्मार्ट'च्या समावेशाचे राजकारण

उत्तम कुटे- सरकारनामा ब्युरो
शनिवार, 31 डिसेंबर 2016

पिंपरी :  केंद्राच्या "स्मार्ट सिटी' प्रकल्पातून नवी मुंबई महापालिकेने माघार घेतल्याने पिंपरी-चिंचवडचा काल (शुक्रवारी) या योजनेत आपोआपच समावेश झाला. मात्र, आगामी पालिका निवडणूक लक्षात घेऊन भाजपने पूर्ण ताकदीने त्याचे श्रेय उचलण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पिंपरी चिंचवडचा समावेश स्मार्ट सिटीत करण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शहर विकासमंत्री वेंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार पिंपरी-चिंचवडच्या भाजप नेत्यांनी मानले आहेत.

उद्योगनगरी आणि पुण्याचा प्रस्ताव
एकत्रित पाठविला गेल्याने पिपरी-चिंचवडला या योजनेतून वगळण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवडता समावेश होताच भाजपने आपल्यावरील टीकेचे उट्टे काढण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर नवी मुंबईत सत्तेत असतानाही तेथे या योजनेतून माघार घेणारा आणि दुसरीकडे उद्योगनगरीचा समावेश न केल्याबद्दल ओरड करणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा दुटप्पी पक्ष  असल्याचा आरोपही भाजपतर्फे श्रेय घेताना आज करण्यात आला आहे. पालिकेतील अनेक
प्रकल्पांत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने करूनही शहराचा "स्मार्ट
सिटी' त समावेश झाल्याची कबुली पक्षाच्या वतीने यावेळी देण्यात आली.

Web Title: The "politics of inclusion of smart city