बारामतीच्या राजकीय सावलीची भीती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

दौंड - ‘‘राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांचे काम चांगल्या प्रकारे सुरू असले तरी त्यांच्यावर बारामतीची राजकीय सावली पडून गडबड होईल, अशी सतत भीती राहते; परंतु राहुल कुल यांनी खंबीर राहावे,’’ असे आवाहन राज्याचे संसदीय कार्य तथा अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी केले.     

आमदार राहुल कुल यांच्या पुढाकाराने दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचच्या आज घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे उद्‌घाटन पालकमंत्री बापट यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, राहुल कुल आदी या वेळी उपस्थित होते. 

बापट म्हणाले, ‘‘मतदारसंघाच्या विकासासाठी व गरजूंना मदत करण्यासाठी कुल यांचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे; पण इतकं सगळं चांगलं काम चालू आहे आणि बारामतीपण जवळ आहे. त्यामुळे बारामतीची सावली दौंडवर पडली की काय गडबड होईल? याची मला सारखी भीती असते.

मात्र, तुम्ही (राहुल कुल) खंबीर राहा, काही घाबरण्याचे कारण नाही. तुमच्या समाजकार्याला आमचा नेहमीच पाठिंबा राहील.’’

‘राहुलच्या अभिनंदनाचा योग’
आरोग्य शिबिराच्या माध्यमातून व उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झाल्याने आमदार राहुल कुल यांचे अभिनंदन करण्याचा योग आज मिळाला. एरवी आम्हाला राहुल (गांधी) यांच्यावर टीका करण्याचा योग जास्त वेळ येतो, अशी कोपरखळी गिरीश बापट यांनी मारली.

Web Title: politics rahul kul girish bapat