सांगवीतील मधुबनमधील चेंबरमधुन सांडपाणी येतेय रस्त्यावर

रमेश मोरे
शनिवार, 30 जून 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील मधुबन सोसायटी प्रमुख रस्त्यावरील सांडपाणी चेंबर तुंबण्याच्या प्रकारामुळे चेंबरमधुन रस्त्यावर पाणी येणे नित्याचे झाले आहे. मधुबनचा हा एकमेव प्रमुख रस्ता असल्याने संपुर्ण मधुबन रहिवासी या रस्त्याचा वापर करतात. जवळच गणपती मंदिर आहे. रस्त्यावर येणाऱ्या सांडपाण्यातुनच नागरीकांना रहदारी करावी लागत आहे.

छोट्या व्यवसायाच्या येथील पाईपलाईन बदलुन येथील प्रश्न सोडवावा अशी नागरीकांच्या वतीने मागणी होत आहे. प्रशासनाकडून चेंबर तुंबल्यावर केवळ स्वच्छता केली जाते. दोन तीन दिवसानंतर पुन्हा या चेंबरची अवस्था जैसे थे होते. यामुळे नागरीकांना सांडपाणी व घाणीतुन मार्गक्रमण करण्याशिवाय पर्याय उरत नाही.

येथील समस्या ही नेहमीची झाली आहे.प्रशासनाने  यावर कायम स्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे.
-गणेश ढोरे मधुबन रहिवासी

येथील दुरूस्तीचे वारंवार आम्ही काम केले आहे. सध्या दुरूस्तीचे काम सुरू आहे.
- प्रिती यादव- कनिष्ठ अभियंता- "ह" प्रभाग 

Web Title: polluted water come on road from drainage in sangavi