प्रदूषणापासून पवना वाचवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पिंपरी - पवना नदीत वाढलेली जलपर्णी, मिसळले जाणारे सांडपाणी, पात्रात टाकण्यात येणारा राडोराडा या विरोधात फुगेवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. २२) आंदोलन केले. ‘प्रदूषणापासून पवना वाचवा’ अशी हाक देत नदी घाटावर मानवी साखळी करून महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.  

मानवी साखळीत महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेविका स्वाती काटे, राजू बनसोडे, माजी नगरसेवक किरण मोटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, प्रा. मनोज वाखारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहराच्या हद्दीतून पवना, इंद्रायणी नद्या वाहतात. शहरात पवनेचे पात्र १८ तर इंद्रायणीचे १६ किलोमीटर आहे.

पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहराची जीवनदायिनी असलेल्या पवना व इंद्रायणी या गटारगंगा झाल्या आहेत. पालिकेचे शहरातील वीस टक्के सांडपाणी आणि बहुतांश उद्योगांचे रसायनमिश्रित पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडले जात आहे. कचराही टाकण्यात येतो. यामुळे नद्यांच्या प्रदूषणाने ओंगळवाणे रूप धारण केले आहे. पवना आणि इंद्रायणी प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. पिंपळे गुरवच्या बाजूने नदीत राडारोडा टाकून पात्र बुजविण्यात येत असल्याचेही ग्रामस्थांनी निदर्शनास आणले. 

विरोधी नेते साने म्हणाले, ‘‘पवना आणि इंद्रायणीची अवस्था अत्यंत भयंकर आहे. पालिका प्रशासनाने पंधरा दिवसांत त्यावर उपाय केला नाही, तर सर्वसाधारण सभेत या प्रश्‍नावर जाब विचारणार आहोत.’’ फुगेवाडीतील नदी पात्रात काही कंपन्यांचे सांडपाणी मिसळत असल्याचे साने यांनी अधिकाऱ्यांना दाखविले. नद्यांत मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे.

त्यामुळे डासांची उत्पत्ती होत असून, नागरिकांना त्याचा त्रास होतो आहे.
प्रा. वाखारे म्हणाले, ‘‘सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये शहराच्या हद्दीतून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नद्यांचा समावेश आहे. त्यामुळे नद्या वाचविण्यासाठी आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. नदीत राडारोडा टाकून पात्र बुजविल्याने आगामी काळात महापूर आला तर फुगेवाडी पाण्यात जाईल, अशी भीती आहे.’’

Web Title: pollution pawana river saving