डाळिंबाला मिळतोय विक्रमी दर

राजकुमार थाेरात
गुरुवार, 22 मार्च 2018

वालचंदनगर : सप्टेंबर महिन्यामध्ये बहार धरलेल्या डाळिंबाच्या बागेतील फळांना चालू महिन्यामध्ये विक्रमी दर मिळत असून शेतकऱ्यांचा चांगला फायदा होऊ लागला असून डाळिंब उत्पादक शेतकरी मालामाल होवू लागले आहेत. 

गतवर्षी जानेवारी ते मे महिन्यामध्ये डाळिंबाची छाटणी करुन बहार धरलेल्या शेतकऱ्यांना कमी दर मिळाला होता. डिसेंबर महिन्यामध्ये तर कवडीमोल दराने शेतकऱ्यांनी डाळिंबाची विक्री केली होती.

काही शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारतळावर डाळिंबे फेकून दिली होती. तर काहीनी १० ते २० रुपये किलो दराने डाळिंबाची विक्री केली होती. मात्र पावसाळ्यातील सप्टेंबर महिन्यामध्ये डाळिंबाचा बहार धरलेले शेतकरी मालामाल होवू लागले आहे.

सप्टेंबर महिन्यातील बहार धरलेल्या शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या काढणीस सुरवात झाली असून ८० ते १२५ रुपये प्रतिकिलो दर मिळत असून शेतकऱ्यांचा फायदा होऊ लागला आहे. पावसाळ्यामध्ये डाळिंबाचा बहार धरुन कळीचे सेंटिंग करणे अवघड असल्याने बहुतांश शेतकरी पावसाळ्यामध्ये डाळिंबाचा बहार धरत नाहीत. यामुळे उन्हाळ्यामध्ये बाजारामध्ये अतिशय कमी प्रमाणात डाळिंब विक्रीस येत असतात. शेळगावमधील मोहन दुधाळ व सुभाष दुधाळ यांचे वीस एकरातील डाळिंब काढण्यास सुरवात झाली आहे.

उच्चांकी दरामुळे फायदा होत आहे : दुधाळ
पावसाळ्यामध्ये डाळिंबाचा बहार धरल्यास कळीचे सेंटींग करणे अवघड जाते. तसेच पाऊस सुरु असल्याने डाळिंबाच्या बागेवरती औषध फवारणीचा खर्चही वाढतो.

उन्हाळ्यामध्ये डाळिंबाला उच्चांकी भाव मिळत असून चांगला फायदा होत असल्याचे शेळगाव (ता.इंदापूर) येथील शेतकरी मोहन दुधाळ व सुभाष दुधाळ यांनी सांगितले.

Web Title: pomegranate getting good rates in Pune Market