डाळिंब, पेरूची हिमाचलमध्येही लागवड - डॉ. राकेश कुमार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

नारायणगाव - ‘‘येथील कृषी विज्ञान केंद्राने डाळिंब व पेरू लागवडीचे विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांना फायदेशीर ठरले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून हिमाचल प्रदेशमधील काही जिल्ह्यांत डाळिंब व पेरू फळबाग लागवडीचा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न केला जाईल,’’ असे मत हिमाचल प्रदेश येथील उद्यानविद्या अधिकारी डॉ. राकेश कुमार यांनी व्यक्त केले.

हिमाचल प्रदेश राज्यातील बिलासपूर, मंडी, चंबा, सिमला, कांगरा, हमीरपूर आदी बारा जिल्ह्यांतील २० उद्यानविद्या अधिकारी व विषय तज्ज्ञांना नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे डाळींब व पेरू लागवड तंत्रज्ञानाचे पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणार्थींनी जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यातील फळबागांना भेट देऊन लागवड, बहार व्यवस्थापन, विक्री, प्रक्रिया आदींबाबत माहिती घेतली. या पथकात हिमाचल प्रदेशमधील फलोत्पादन विभागाचे उद्यानविद्या अधिकारी डॉ. राकेश कुमार, डॉ. अमित शर्मा, डॉ. राकेश राणा, डॉ. शिवकुमार, विषयतज्ज्ञ डॉ. अरविंद शर्मा आदींचा समावेश होता. प्रशिक्षणादरम्यान कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर, वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे, प्रा. राहुल घाडगे, भरत टेमकर, मृदाशास्त्रज्ञ योगेश यादव, गृहविज्ञान शास्त्रज्ञ निवेदिता डावखर यांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणाचे नियोजन कार्यक्रम अधिकारी धनेश पडवळ, शास्त्रज्ञ टेमकर यांनी केले.

डाळिंब व पेरू फळबागांसाठी आवश्‍यक असलेल्या वातावरणाचा अभ्यास करून येथील तंत्रज्ञानाची सांगड घालून डाळिंब व पेरू लागवडीचा प्रयोग यशस्वी केला जाईल.
- डॉ. राकेश कुमार

Web Title: pomegranate guava horticulture dr. rakesh kumar