शिर्सुफळला शाॅर्टसर्किटमुळे डाळिंबाचे झाडे जळाली

संतोष आटोळे
रविवार, 25 मार्च 2018

शिर्सुफळ येथे शाॅर्टसर्किटमुळे फळास आलेली सुमारे तीस ते चाळीस डाळींबाची झाडे जळाली. यामध्ये ठिंबक पाईपाचेही नुकसान झाले. तर शेजारीच असलेली झोपडीत दोन लहान मुले झोपली होती. सुदैवाने झोपडीला आग लागण्यापूर्वी विझवण्यात यश आले. यामुळे मोठी जीवीत व वित्तहानी झाली टळली.

शिर्सुफळ - शिर्सुफळ (ता. बारामती) येथील बिबे-जरांडे वस्ती येथील संभाजी आबु बिबे यांच्या शेत व घराच्या परिसरातुन जाणाऱ्या विजवाहिनी कंपनीच्या तारांच्या घर्षणाने शाॅर्टसर्किट झाले. यामुळे फळास आलेली सुमारे तीस ते चाळीस डाळींबाची झाडे जळाली. यामध्ये ठिंबक पाईपाचेही नुकसान झाले. तर शेजारीच असलेली झोपडीत दोन लहान मुले झोपली होती. सुदैवाने झोपडीला आग लागण्यापूर्वी विझवण्यात यश आले. यामुळे मोठी जीवीत व वित्तहानी झाली टळली.

याबाबत सविस्तर माहीती अशी कि, शिर्सुफळ येथील बिबेवस्ती परिसरात संभाजी आबु बिबे यांची शेती आहे. तेथेच त्यांचे झोपडीचे घर आहे. त्यांच्या शेती व घरा वरुन विजवाहक तारा गेलेल्या आहेत. शुक्रवार (ता. 23) रोजी दुपारी अचानक शेताच्या परिसरातील व घराच्या मागच्या बाजुकडील वाळलेल्या गवताने पेट घेतल्याचे लक्षात आले. त्याचवेळी ही आग शेजारच्या डाळींबाच्या बागेत पोहचली. ही बातमी समजताच त्यांच्या कुटुंबियांसह आग विझविण्यासाठी शेतात धाव घेतली. तीन - चार तासांच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले. तोपर्यत डाळींबाची सुमारे तीस ते चाळीस झाडाला आगीची झळ बसली. यामध्ये ठिबकचेही नुकसान झाले. याबाबत गाव कामगार तलाठी यांना कळवुनही दोन दिवस झाले तरी पंचनामा न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

दरम्यान झालेल्या नुकसानीची शिर्सुफळचे सरपंच अतुल हिवरकर, गाडीखेलचे सरपंच बाळासाहेब आटोळे, साबळेवाडी माजी सरपंच सतिश गोलांडे, दादासाहेब आटोळे, दिपक मेरगळ यांनी पाहणी केली व शासनाने पंचनामा करुन मदत देण्याची मागणी केली.
 

Web Title: Pomegranate plants burnt due to shirsofala short circuit