दुष्काळामुळे डाळिंबाचे भाव कडाडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

पुणे : राज्याच्या डाळिंब उत्पादित क्षेत्रामध्ये पाऊस पडला नसल्याने त्याचा फटका यंदा डाळिंब उत्पादनाला बसला आहे. डाळिंब उत्पादन घटले आहे. त्यामुळे मार्केट यार्डात या फळाची आवक घटली आहे. आवक घटल्याने डाळिंबाच्या भावात 50 ते 60 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून, किरकोळ बाजारात दर्जानुसार 50 ते 300 रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. 

घाऊक बाजारात डाळिंबास दर्जानुसार 20 ते 200 रुपयेपर्यंत भाव मिळत आहे. जिल्ह्यासह राज्यात मागील चार-पाच वर्षांत डाळिंबाच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे मागील पाच वर्षांत उत्पादनात वाढ होऊन डाळिंबाचे भाव हे आवाक्‍यात होते. मात्र, यंदा राज्यातील विविध भागांत पाऊस न झाल्याने डाळिंबाच्या बागांना पाणी कमी उपलब्ध झाले. परिणामी, उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बाजारातही आवक घटून भावात वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी बापू भोसले यांनी दिली. 

"बाजारात दाखल होणाऱ्या डाळिंबापैकी 60 टक्के हलक्‍या दर्जाची, तर 40 टक्के चांगल्या दर्जाची डाळिंब फळे येत आहेत. दुसरीकडे मागणीच्या तुलनेत ही आवक कमी असल्याने डाळिंबाला चांगला भाव मिळत आहे. यंदा चांगला पाऊस झाला असला तरी त्याचा फायदा पुढील वर्षाच्या हंगामात होणार आहे. नवरात्रोत्सवात भावात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे." 
- युवराज काची, उपाध्यक्ष, मार्केट यार्ड अडते असोसिएशन 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pomegranate prices increasd due to drought