पुणेकरांना संत्री, मोसंबी आंबटच...

santri.jpg
santri.jpg

मार्केट यार्ड (पुणे) : मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात फळबाजार पूर्वपदावर येऊ लागला आहे. तसेच डाळींबाचा नवीन हंगाम सुरू झाला आहे. डाळिंबाची बाजारात आवक वाढली आहे. त्यातुलनेत मागणीही चांगली असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. तसेच संत्रा, मोसंबीलाही चांगली मागणी आहे. त्याचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत वीस टक्क्यांनी वाढले आहेत. उर्वरीत सर्व फळांची आवक जावक स्थिर असल्याने भाव टिकून आहेत.

लिंबासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात लिंबे दाखल होत आहे. मात्र, ग्राहक नसल्याने त्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. मागील आठवड्यात लिंबाची गोणी १५०-२०० रुपयांना होती. या आठवड्यात भाव घसरून ती १०० रुपायंवर आली आहे. रविवारी येथील बाजारात केरळ येथून अननस 3 टेम्पो, मोसंबी 10 टन, संत्री 2 टन, डाळिंब 1 हजार क्रेटस्, पपई 20 ते 25 टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, पेरू 150 ते 200 क्रेटस्, कलिंगड 10 ते 15 टेम्पो, खरबुजाची 3 ते 4 टेम्पो आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : 80-100, अननस (डझन) : 70-250, मोसंबी : (3 डझन) : 100-250, (4 डझन ) : 50-100, (1 किलो) 15-40, संत्रा : (1 किलो) : 40-100, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : 25-110, गणेश : 5-20, आरक्ता 15-40. कलिंगड : 8-10, खरबूज : 20-22, पपई : 3-10, पेरू : 200-350.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com