पोषण आहाराच्या धान्यात किडे (व्हिडिओ)

पोंदेवाडी (ता. आंबेगाव) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या कडधान्यातील किडे दाखविताना ग्रामस्थ.
पोंदेवाडी (ता. आंबेगाव) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या कडधान्यातील किडे दाखविताना ग्रामस्थ.

पारगाव (पुणे) : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात किडे आढळले. शाळेच्या नोंदवहीतील कडधान्याचा साठा व प्रत्यक्षातील कडधान्य यामध्येही मोठी तफावत दिसून आली. कडधान्य अनेक दिवसांपासून पडून असल्याने त्यास किडे लागले आहेत. याच निकृष्ट कडधान्याचा आहार विद्यार्थांना दिला जात होता. त्यामुळे पालक संतप्त झाले आहेत.

खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज, सरपंच जयसिंग पोंदे, संदीप पोखरकर, भाऊसाहेब पोंदे व शाळा व्यवस्थापन अध्यक्ष वसंत पोपट रोडे, आनंदा पोंदे, अर्जुन महाराज वाळुंज, चंदू इरकर, संतोष पोखरकर व ग्रामस्थांनी शनिवारी (ता. 6) सकाळी प्राथमिक शाळेतील पोषण आहार शिजविणाऱ्या खोलीची पाहणी केली असता ही बाब उघड झाली. चवळी, वाटाणा, मटकी, मूग व उडीद डाळीत मोठ्या प्रमाणात किडे आढळले. बऱ्याच दिवसांपासून धान्य पडून असल्याने त्याचा भुस्सा होऊ लागला आहे. तांदूळ, तेल व उडीद डाळीचे पुडेही मोठ्या प्रमाणात पडून आहे. निकृष्ट कडधान्य वापरून तयार केलेला पोषण आहार विद्यार्थांना दिला जात होता. मुख्याध्यापक मनोहर पंचरास यांनी याबाबत मोघम उत्तर दिले. दरम्यान, माध्यमिक विद्यालयातही कडधान्यात किडे आढळले.


दोषींवर कारवाई ः गटशिक्षणाधिकारी
जिल्हा परिषद व पंचायत समितीने या प्रकाराची सखोल चौकशी करून विद्यार्थांच्या जिवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाळुंज यांनी केली आहे.
गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन यांनी, सोमवारी शिक्षणविस्तार अधिकाऱ्यामार्फत पोषण आहाराच्या कडधान्याची पाहणी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com