esakal | पूजा चव्हाण प्रकरणात चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

pooja chavan suicide chandrakant patil uddhav thackaray

भाजपच्या अनेक नेत्यांनी पूजा आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले आहेत. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट शिवसेनेच्या मंत्र्यांचे नाव घेऊन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपने आता महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी पूजा आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले आहेत. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट शिवसेनेच्या मंत्र्यांचे नाव घेऊन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूजा चव्हाण यांना न्याय देणार का असा प्रश्नही विचारला.

महिलांचा सन्मान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेवर आपण चालतो असं म्हणणारे उद्धव ठाकरे पूजा चव्हाणला न्याय देणार का? या प्रकरणात एक मंत्री आहेत हे स्पष्ट झालं आहे. तरीही पोलिस चौकशी का करत नाहीत? मुलीच्या आई वडिलांनी तक्रार दिली नसल्याचं म्हटलं जातंय. तर सुमोटो केस दाखल करायला हवी असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकारण सुरु असताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, सरकारची प्रतिमा कंलकित होत चालली आहे. काही केलं तरी काहीही होत नाही असं या सरकारच्या कार्यकाळात होत असल्याचं दिसतंय असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

हे वाचा - मोठी बातमी : पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही तक्रार नाही

धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावरही चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, एक मंत्री 15 वर्षे एका महिलेसोबत राहतो. महिलेनं तक्रार केल्यानंतरही कारवाई होत नाही. दुसरा मंत्री कार्यालयात बोलावून मारहाण करतो. या सरकारमध्ये काय चाललंय? पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकऱणानंतर आता पुन्हा सर्व प्रश्न समोर येत आहेत. महाराष्ट्र सुरक्षित नाही. सत्तेसाठी काहीही करणार अशी परिस्थिती आहे. ज्यांच्या इशाऱ्याने सरकार चालते त्या शरद पवार यांनी आता लक्ष घालावं असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. 

एका राज्यमंत्र्याचे नाव या प्रकऱणात जोडले जात आहे. तसे अनेक मेसेज, ऑडिओ क्लिप समाजमाध्यमातून प्रसारित झाले आहेत. यावरून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधीत प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी पत्रकार परिषदेत याआधी केली होती. 

हे वाचा - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपने घेतलं थेट शिवसेनेच्या मंत्र्याचं नाव

बीडमधील परळी येथील पूजा लहू चव्हाण (वय २२, रा. हेवन पार्क, महंमदवाडी) या तरुणीने रविवारी मध्यरात्री इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना हडपसरजवळील महंमदवाडी परिसरात घडली होती. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अद्याप तरुणीच्या नातेवाईकांनी पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल केलेली नाही. 
 

loading image