पु्णे : गॅसगळतीमुळे घरात लागली आग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

पुणे  : घरामध्ये शेगडीतुन गॅस गळती झाल्यानंतर महिला देवघरात दिवा लावताना पसरलेल्या गॅसने पेट घेतला. ही घटना रविवारी सकाळी 9 वाजता आंबेगाव पठार येथे घडली. या घटनेत एक महिला जखमी झाली तर घरातील वस्तुंचे नुकसान झाले आहे. 

आंबेगाव पठार येथील साई संस्कृती अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर एक कुटुंब राहते. सकाळी 9 वाजता संबंधित सदनिकेत शेगडीतुन गॅस गळती झाली होती. ही बाब घरातील लोकांच्या लक्षात आली नाही. दरम्यान महिलेने देवघरात दिवा लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्फोट होऊन मोठा आवाज झाला. या घटनेत महिलेस काही प्रमाणात भाजले आहे. तर घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
Web Title: Poona: Fire in the house due to gas leakage