23 फेब्रुवारीची सकाळ भाजपचीच : पूनम महाजन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

पुणे : "पुष्कळ घड्याळं फिरली, हातही हलले; पण विकासाची साखळी सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी परिवर्तन आवश्‍यक आहे. भाजपची सत्ता केंद्रात, राज्यात आली आहे. आता पुणे महापालिकेत आली पाहिजे. मला विश्‍वास आहे, की 23 फेब्रुवारीची सकाळ भाजपचीच असेल, हेच ध्येय ठेवून युवकांनो, "परिवर्तन के सिपाई' म्हणजेच "एजंट ऑफ चेंज' व्हा आणि कामाला लागा,'' असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांनी युवा कार्यकर्त्यांना केले.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पूनम महाजन यांची निवड झाली. त्याबद्दल युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, युवा मोर्चाचे राष्ट्रीय सदस्य सुशांत शुक्‍ला, जिल्हाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, पुणे शहराध्यक्ष दीपक पोटे यांच्यासह अन्य जिल्ह्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाजन म्हणाल्या, ""भारताच्या सुवर्णकाळासाठी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्ता हाती घेतली आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. पुण्यात आठ आमदार, एक खासदार भाजपचा आहे. पुणेकरांच्या विचारांनी परिवर्तने घडली आहेत. तरुण रक्तालाही पुणेकरांनीच परिवर्तनाची ताकद दिली. युवा मोर्चाचे काम केवळ झेंडा आणि दंडा फिरविण्यापुरते नाही. देशातील चौदा राज्यांतील सत्तेत तरुणांचा सहभाग आहे. युवकांचे स्वप्न हेच देशाचे स्वप्न होय. पंतप्रधान मोदी देशातील जनतेशी थेट संवाद साधत आहेत. राज्यालाही तरुण मुख्यमंत्री मिळाला आहे. म्हणूनच तरुणांनो, परिवर्तनासाठी एकत्र या. लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा. कारण तरुणच भाजपची सत्ता पुणे महापालिकेत आणू शकतो.''

महाजन म्हणाल्या...
- पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेनेची युती होईल की नाही हे लवकरच स्पष्ट होईल.
- युवा मोर्चाच्या तरुणांनी बूथपर्यंत पोचावे.
- तरुणांना तिकीट देण्याबाबत मुख्यमंत्री विचार करतील.
- नोटाबंदीनंतर पंचायत समितीतही भाजपला यश मिळाले.
- जनतेचा भाजपला आशीर्वाद आहे, म्हणूनच आताही यश मिळेल.

Web Title: poonam mahajan confident to win in pune