पुणे-सातारा रस्त्याबाबत महत्वाची बातमी

sagar.jpg
sagar.jpg

खेड-शिवापूर : पावसामुळे संपूर्ण पुणे-सातारा रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्डयात वाहने आदळून अपघात होत आहेत. विशेष म्हणजे सुमारे पाच महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप स्थानिक नागरीकांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडी ते सारोळा दरम्यान मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वेळू, शिवरे, वरवे, चेलाडी फाटा याठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. वेळू  येथील उड्डाणपूल संपल्यावर रस्त्यावर पडलेल्या खड्डयात अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील हे खड्डे जीवघेणे झाले आहेत.
त्यातच गेल्या चार पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने तर खड्डयांचे प्रमाण वाढले आहे.

विशेष म्हणजे वेळू, वरवे आणि चेलाडी येथील रस्त्याचे सुमारे पाच महिन्यापुर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र पाच महिन्यातच या रस्त्यावर  खड्डे पडल्याने रस्त्याचे हे काम निकृष्ट करण्यात आले आहे, असा आरोप नागरीकांनी केला आहे. रस्त्यावर खड्डयांमुळे होणारी गैरसोय दूर होण्यासाठी हे खड्डे ताबडतोब बुजवावेत, अशी मागणी नागरीक करत आहेत.

याबाबत रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता खड्डे बुजविणे आणि रस्ता दुरुस्तीचे काम एका कंपनीला दिले आहे. त्यांच्याकडून लवकरात लवकर खड्डे बुजविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

ठेकेदाराला जबाबदार धर- पुणे-सातारा रस्त्यावरील हे खड्डे प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. खड्डे दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याने त्याठिकाणी होणाऱ्या अपघाताला संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com